नवी दिल्ली : वाहन कंपन्यांसाठीही नोव्हेंबर महिना चांगलाच ठरला आहे. या महिन्यात विविध कंपन्यांच्या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. Hyundai Motor India Limited, Skoda Audi India, Nissan Motor आणि MG Motor India सारख्या कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर लक्षणीय वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये Hyundai Motor India Limited (HMIL) ची एकूण विक्री 36 टक्क्यांनी वाढून 64,004 युनिट झाली. कंपनीने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये डीलर्सना 46,910 युनिट्स पाठवले आहेत. कंपनीने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 37,001 युनिट्सच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये 30 टक्के वाढ करून 48,003 युनिट्सची विक्री केली.
ह्युंदाई मोटर इंडियाचे संचालक तरुण गर्ग म्हणाले, की 2022 मध्ये देशांतर्गत विक्रीचा उच्चांक गाठण्यासाठी कंपनी सज्ज आहे. त्याचप्रमाणे, स्कोडा ऑटो इंडियाची विक्री गेल्या महिन्यात दुप्पट होऊन 4,433 युनिट्स झाली. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये 2,196 युनिट्सची विक्री केली. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर यांनी एका निवेदनात सांगितले की, डिसेंबर महिना अजून यायचा असताना आमची वार्षिक विक्री 2021 च्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
निसान मोटर इंडियाची एकूण घाऊक विक्री 6,746 युनिट्स झाली, जी वार्षिक 20 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डीलर्सना 5,605 युनिट्स पाठवले होते. तथापि, त्याची देशांतर्गत विक्री गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 2,651 युनिट्सवरून घटून यावर्षी 2,400 युनिट्सवर आली आहे.
याशिवाय, ऑटो प्रमुख एमजी मोटरची किरकोळ विक्री नोव्हेंबरमध्ये वार्षिक 64 टक्क्यांनी वाढून 4,079 युनिट्सवर गेली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी याच महिन्यात 2,481 मोटारींची विक्री केली होती. Kia India ची एकूण विक्री देखील नोव्हेंबर 2022 मध्ये 69 टक्क्यांनी वाढून 24,025 युनिट्स झाली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी 14,214 वाहनांची विक्री केली होती.
- हे सुद्धा वाचा : .. तर देशात वाहने होतील आधिक स्वस्त; सरकारने करायचे फक्त ‘इतकेच’ काम..!
- .. म्हणून ‘त्या’ कार कंपनीने भारतीयांसाठी केले ‘हे’ खास काम; ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य