Top 10 Family Cars in India : तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला अशी कार घ्यायची आहे ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब आरामात प्रवास करू शकेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला देशातील टॉप-10 फॅमिली कारबद्दल सांगणार आहोत. आमचा कॅटलॉग मारुती सुझुकी एर्टिगा/XL6 ते रेनॉल्ट ट्रायबरपर्यंत आहे. आम्ही तुम्हाला या कारच्या किंमतींसह महत्वाच्या वैशिष्ट्यांबदद्ल माहिती देणार आहोत.
Renault Triber
Renault Triber ही भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 7-सीटर कारपैकी एक आहे. त्याची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे आणि किंमत 6.33 लाख रूपये एक्स-शोरूमपासून सुरू होते. जर तुम्ही कमी किमतीत चांगली फॅमिली कार शोधत असाल तर तुम्ही Renault Triber कार खरेदी करण्याचा विचार निश्चित करू शकता.
Kia Carens
तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी Kia Carens देखील निवडू शकता. त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये सनरूफ आणि प्रीमियम फीचर्ससह हाय-एंड केबिन आहे. Kia Carens 10.44 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही कार कदाचित तुमच्या बजेटबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कार खरेदी करताना आधी तुमच्या बजेटचा विचार करा नंतरच कार घ्यायची की नाही हे ठरवा.
सध्या देशभरात इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. नेहमीच्या तुलनेत इंधनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आता इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय काय याचा विचार केला जात आहे. जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांकडे लोकांचा कल वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही वाढली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास कारची माहिती देणारआहोत.
Maruti Suzuki Grand Vitara
या मारुती कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते. अलीकडेच लाँच झालेली SUV 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, ड्युअल स्लाइडिंग पॅन्ससह पॅनोरामिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जिंग यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह कार येते. या कारची किंमत पाहिली तर प्रत्येकालाच खरेदी करता येईल असे नाही. आता कार खरेदीसाठी वित्त संस्था, बँका कर्ज सुविधा देत आहेत. तुम्ही जर कर्ज घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी या कर्जाचे व्याजदर तपासा. कारण, या कर्जाच व्याजदर जास्त आहेत.
Hyundai Creta
Hyundai Motor India ने अलीकडेच RDE इंजिनसह 2023 Hyundai Creta लाँच केले आहे, ज्याची प्रारंभिक किंमत रु. 10.84 लाख (एक्स-शोरूम) आहे. 2023 Hyundai Creta ला मानक म्हणून सहा एअरबॅग मिळतात. यामुळे ही कार एक परिपूर्ण फॅमिली कार बनते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारमध्ये सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करू शकता. या कारची किंमतही अकरा लाखांच्या आसपास आहे.
Maruti Suzuki Ertiga/XL6
ही मारुती कार भारतातील सर्वाधिक विकली जाणारी MPV आहे. हे 8.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी तुम्ही त्याचे 6-सीट कॉन्फिगरेशन मॉडेल XL6 नावाने 11.41 लाख ते 14.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता.
Toyota Innova Crysta
Toyota Innova Crysta 19.13 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. इनोव्हा क्रिस्टा भारतातील सर्वोत्कृष्ट फॅमिली कारमध्ये गणली जाते. त्याच्या मधल्या रांगेत कॅप्टन सीट देण्यात आली आहे. इनोव्हा क्रिस्टल 2.4L डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. तसेच, यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. या कारची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
MG Hector
एमजी मोटर इंडियाने अलीकडेच 2023 एमजी हेक्टर 14.72 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत सादर केले. 14-इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ब्लूटूथ की, रिमोट लॉक/अनलॉक सारखी वैशिष्ट्ये या एसयूव्हीमध्ये उपलब्ध आहेत.
Tata Safari
अलीकडेच टाटाने हे अॅडव्हान्स रोड सेफ्टी आणि पॅनोरमिक सनरूफ सारख्या अनेक मोठ्या वैशिष्ट्यांसह सादर केले आहे. आता त्यात ADAS देखील उपलब्ध आहे. Tata Safari ची बाजारात किंमत 15 लाख 64 हजार रुपये आहे. कारची किंमत जास्त आहे.
Mahindra XUV700
ही महिंद्राची कार आहे जी प्रीमियम केबिन आणि पॅनोरामिक सनरूफसह येते. ही 7-सीटर SUVs पैकी एक आहे. Mahindra XUV700 च्या 7-सीटर व्हेरिएंटच्या किंमती 17.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होतात.
Hyundai Alcazar
Hyundai ची ही 7-सीटर प्रीमियम SUV पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स आणि इतर हाय-एंड वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. Hyundai Alcazar च्या किमती रु. 16.77 लाखापासून सुरू होतात आणि रु. 21.13 लाखांपर्यंत जातात.