दिल्ली – जगभरातील वाढती महागाई आणि सेमी कंडक्टर (Semi Conductor) कमतरता यामुळे अनेक वाहन उत्पादकांना त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करणे भाग पडले आहे, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर झाला आहे. यानंतर आता रिजर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ करून जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे आता जर तुम्ही EMI वर नवीन कार किंवा दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी थोडे खर्चिक ठरू शकते.
रेपो रेटमध्ये वाढ झाल्याच्या बातम्यांचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. परंतु ऑटोमोटिव्ह सेगमेंट विशेषतः प्रभावित होईल. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (FADA) चे अध्यक्षांनी सांगितले, की “रेपो दरात वाढ करण्याच्या बँकेच्या निर्णयाने सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. या निर्णयामुळे वाहन कर्ज घेणे महाग होणार आहे.
रेपो दर म्हणजे आरबीआय ज्या दराने व्यापारी बँका आणि इतर बँकांना कर्ज (Loan) देते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने रिजर्व्ह बँकेकडून बँकांना दिले जाणारे कर्जही महाग होणार असून बँकेकडून ग्राहकांना मिळणारे कर्जही खर्चिक होणार आहे. रेपो दर आता 4 टक्क्यांवरून 4.40 टक्के करण्यात आला आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावर परिणाम होणार आहे. जर क्रेडिटची किंमत जास्त राहिली तर संबंधित उत्पादनांची मागणी देखील कमी होईल.
रेपो दरातील कोणत्याही बदलाचा परिणाम थेट ऑटोमोबाईल कंपन्या, ऑटो पार्ट्स किंवा उपकरणे उत्पादकांवर दिसून येतो. याशिवाय, होम लोन ईएमआयमध्ये बदल झाल्यामुळे, रिअल इस्टेट कंपन्या, एनबीएफसी, सिमेंट, स्टील यासह इन्फ्रा क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सुमारे 200 क्षेत्रातील कंपन्या रिअल इस्टेट संबंधित आहेत.
जरा थांबा.. इतक्यात महागाई हटणार नाही; पहा, काय आलीय टेन्शन देणारी बातमी..