Auto Expo 2023: मुंबई : गाडी शौकीन असोत की गरज म्हणून गाडी वापरणारे असोत. सर्वांचे लक्ष असते ते आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोवर. यंदा दिनांक ११ जानेवारीपासून या मोठ्या एक्स्पोला धडाक्यात सुरुवात झाली. यंदाच्या या सोळाव्या आवृत्तीला ‘द मोटर शो’ असे नाव देण्यात आले आहे. जगभरातील मंडळी यास भेट देत आहेत, किंवा ऑनलाइन पद्धतीने यात काय चालले आहे याकडे लक्ष ठेऊन आहेत. (400km Range In Single Charge And The Top Speed Of This Car Is 185kmph)
यंदाही या मोठ्या शोमध्ये देश-विदेशातील बड्या कंपन्यांनी आपल्या कल्पना आणि कारचे अनावरण केले आहे. यात एमजी मोटर्स (MG Motors Electric Car) यांची ‘MG5’ ही इलेक्ट्रिक कार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण ही इलेक्ट्रिक कार युरोपच्या बाजारपेठेत विकली जात आहे. तीच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. MG5 ही इलेक्ट्रिक कार परदेशी बाजारपेठेत यशस्वी झाल्यानंतर आता कंपनी भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची योजना आखत आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ती सिंगल चार्ज केल्यावर ४० मिनिटांत ४०० किमी धावू शकते. अशी ही इलेक्ट्रिक कार लाँच झाल्यावर टाटा नेक्सॉन ईव्हीला बाजारात टक्कर देईल असे अनेकांना वाटत आहे. कारण यामध्ये अनेक लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत.
MG5 इलेक्ट्रिक कारच्या डिझाईनबद्दल अनेकांना कौतुक आहे. या कारला एक ठळक ब्लँक-ऑफ फ्रंट ग्रिल आणि स्वीप्ट-बॅक स्लीक हेडलॅम्प्स मिळतात. समोरच्या बंपरमध्ये चार्जिंग पोर्ट मध्यभागी आहे. तर, इलेक्ट्रिक कारच्या मागील भागाच्या डिझाईनबद्दल सांगायचे असल्यास त्यामध्ये अतिशय सुंदर दिसणारे एलईडी टेललाइट्स आहेत. कारच्या या डिझाईनशी ते सुसंगत वाटत असल्याने अनेकांना ही आवडत आहेत.
या इलेक्ट्रिक कारच्या आतील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह ती अतिशय सुंदर दिसतात. यात ३-स्पोक स्टीयरिंग व्हील आहेत. कारला रोटेटिंग ड्राइव्ह मोड नॉब आणि मध्यवर्ती माउंट आयताकृती टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.