Author: SM Chobhe

News Editor, Krushirang

Adani Group Shares: मुंबई : श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या समभागांची आजही (दि. २७ जानेवारी) जोरदार विक्री सुरू आहे. कंपनीच्या बाबतीत आलेल्या बातमीने आजच्या व्यवहारात विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. काही समभागांमध्येही लोअर सर्किट लागले आहे. एकूणच फॉरेन्सिक फायनान्शिअल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाने अदानी समूहाच्या समभागांबद्दलची सार्वत्रिक भावना खराब झाली आहे. याआधी बुधवारीही त्यात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप एका दिवसात ९० हजार कोटींहून अधिक घटले होते. एकूणच यामुळे बाजाराला अदानी झटका सहन करावा लागला आहे. नुकतेच या कंपनीचे शेअर घेतलेल्या अनेकांच्या पैशांची यामुळे धूळधाण झाली आहे. आजच्या…

Read More

BBC documentary: मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाबद्दल जगभरात चर्चा सुरू आहेत. यामुळे एका अर्थाने खळबळ पण उडाली आहे. त्यामुळेच मोदी, मनुवादी आणि भाजप समर्थक यांच्याकडून बीबीसीच्या या माहितीपटाला भारतापासून लंडनपर्यंत विरोध होत आहे. भारत सरकारने या माहितीपटावर घातलेल्या बंदीच्या विरोधात काही लोक उभे राहिले आहेत. तर, विरोधी पक्षांनी तो मुद्दा तापवला आहे. मात्र, एकूण रंगारंग लक्षात घेता यातून वेगळ्या अर्थाने कोणाला राजकीय फायदा होणार, याचीही चर्चा सुरू आहे. बंदी घातलेल्या या डॉक्युमेंट्रीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्क्रीनिंगवरून डाव्या विद्यार्थी संघटनांनी जेएनयू आणि जामियामध्ये गोंधळ घातला आहे. या माहितीपटावर बंदी घालून सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचे…

Read More

Exploitation In Aksai Chin India Gold Mine: दिल्ली: भारताचा मुजोर आणि श्रीमंत शेजारी चीन ही अवघ्या जगाची डोकेदुखी बनला आहे. त्याच मुजोर देशाने आता लडाखमध्ये 50,000 हून अधिक सैनिक आणि प्राणघातक शस्त्रे तैनात करून भारतावर दबाव वाढवला आहे. तसेच चीनने आता या भागातून भारताच्या नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू केली आहे. 40 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या अक्साई चिनच्या ओसाड डोंगराळ प्रदेशातून अब्जावधी डॉलर्सचा खजिना काढण्यात आता चीन गुंतला आहे. ही भारताची भूमी आहे. मात्र, सध्या चीनच्या ताब्यात आहे. जिथून आता चीन आणखी सोनेरी होण्याची स्वप्न पाहत आहे. (Zinc Mine Ladakh And Gold Mine Near Arunachal Pradesh) फक्त 10 हजार इतकीच…

Read More

पुणे : सरकारी ठेकेदार आणि विविध विभागांनी राबावलेली विकास कामे याबद्दल उलट-सुलट चर्चा होताना दिसते. कारण, यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण कार्यवाही झालेली असेलच असा सर्वमान्य ग्रह असतो. मात्र, प्रत्येकवेळी तो खरा असेल असेच नाही. म्हणूनच केंद्र सरकारने ऑगस्ट 2016 मध्ये गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस अर्थात जेम (government e-market place) हे पोर्टलवरून वस्तू व सेवांची सार्वजनिक खरेदी करण्याची सुरुवात झाली. आता यावर लाखो कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा खरेदी सरकारी अस्थापनांनी केली आहे. ग्रामपंचायत ते केंद्र सरकारचे विविध विभाग असे सगळे यावर खरेदी करत आहेत. (how to use government eportal / Gem for purchase, Marathi information / mahiti) 1 डिसेंबर 2016 च्या सुधारित खरेदी…

Read More

Auto Expo 2023: मुंबई : गाडी शौकीन असोत की गरज म्हणून गाडी वापरणारे असोत. सर्वांचे लक्ष असते ते आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोवर. यंदा दिनांक ११ जानेवारीपासून या मोठ्या एक्स्पोला धडाक्यात सुरुवात झाली. यंदाच्या या सोळाव्या आवृत्तीला ‘द मोटर शो’ असे नाव देण्यात आले आहे. जगभरातील मंडळी यास भेट देत आहेत, किंवा ऑनलाइन पद्धतीने यात काय चालले आहे याकडे लक्ष ठेऊन आहेत. (400km Range In Single Charge And The Top Speed Of This Car Is 185kmph) यंदाही या मोठ्या शोमध्ये देश-विदेशातील बड्या कंपन्यांनी आपल्या कल्पना आणि कारचे अनावरण केले आहे. यात एमजी मोटर्स (MG Motors Electric Car) यांची ‘MG5’ ही…

Read More

अहमदनगर : तालुक्यातील इसळक गावातील ज्येष्ठ महिला व्यक्तिमत्त्व तुळसाबाई सुखदेव गेरंगे ह्यांचे बुधवारी (दि. 11 जानेवारी 2023) रात्री 1 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 90 वर्षांच्या होत्या. तुळसाबाई परिसरात ‘काळूबाई’ नावाने सर्वपरिचित आहेत. त्या प्रेमळ सुस्वभावी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून पडल्या होत्या. अखेरीस हा संघर्षमय प्रवास आज थांबला. त्यांच्या जाण्याने इसळक-निंबळक परिसरातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रसिद्ध हाडांचे वैद्य आणि माजी पोलीस पाटील सुखदेव गेरंगे पाटील ह्यांच्या त्या पत्नी होत. तसेच इसळक निंबळक सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी गेरंगे ह्यांच्या मातोश्री असून सरपंच संजय गेरंगे ह्यांच्या त्या चुलती होत्या. इसळक स्मशानभूमीत सकाळी 11…

Read More

Mumbai Marine Drive मुंबई : देशाची आर्थिक राजधानी (financial capital of the country) म्हणजे मुंबई आणि मुंबईला फिरायला गेल्यावर सगळ्यात भारी अनुभव देणारा रस्ता म्हणजे मरीन ड्राइव्ह. त्यामुळेच या ठिकाणाला एक पर्यटनदृष्ट्या खूप महत्व आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली येथील मास्टर ऑफ डिझाईन विषयाचा विद्यार्थी राहिलेला आणि पुण्यात राहणाऱ्या डिझाइनर, शोधक अभियंता पराग (Parag, Master of Design at Indian Institute of Technology (IIT) Delhi and lives in Pune) यांनी याबाबत क्वॉरा यावर चांगली माहिती दिली आहे. आतापर्यंत किमान ३ लाख वाचकांनी हे वाचलेले आहे. पराग लिहितात की, मरीन ड्राईव्ह प्रमाणेच जगभरात बहुतेक समुद्र किनारी आपण जे कॉंक्रिटचे ठोकळे पाहतो…

Read More

National Highway: पुणे : आपण वाहन चालक असाल किंवा नियमित प्रवासी असाल तर आपणास डांबरी रोडावरून जाताना जो अनुभव येतो तो सीमेंट रोडावरून जाताना येत नसल्याचे वाटत असेल. अनेकांना असाच अनुभव वाटतो. डांबरी रस्त्यावरून जाताना सीमेंट रस्त्याच्या तुलनेत आल्हाददायक वाटल्याचे अनेकजण सांगतात. मात्र, आता भाजप सरकार आणि मुख्य म्हणजे मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात सगळीकडे रस्ते सरसकट सीमेंट कोंकरिटचेच (BJP government and chief minister Nitin Gadkari, roads are being made of cement concrete everywhere) होत आहेत. त्यामुळे तसाही सामान्य जनतेपुढे आता पर्याय नाही. तर, आता आपण पाहुयात की याबाबत काय स्थिती आहे. (What do you think.. asphalt or concrete road…

Read More

China Projects in Himalaya: दिल्ली : भारताचा शेजारी आणि छोटा बफर देश असलेल्या नेपाळला बळकावण्यासाठी चीनने सर्व शक्ती पणाला लावण्याचे ठरवले आहे. नुकतेच नेपाळच्या पोखरा या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) याद्वारे नेपाळमध्ये बांधलेला हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, त्याचवेळी नेपाळ सरकारचा दावा आहे की हा प्रकल्प चीनच्या निधीतून बांधला गेला असला तरीही तो बीआरआयचा भाग नाही. एकूणच चीनचा कावा उघडकीस आल्याने नेपाळ आता वेगळ्या वळणावर याबाबत भाष्य करताना पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातून काय साध्य होणार हाच मुद्दा आहे. (China Belt And Road Initiative Projects In Nepal Pokhara Airport…

Read More

Marathi Film Tarri: अहमदनगर : राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे (National award-winning director Mahesh Raosaheb Kale) पुढील महिन्यात नवा चित्रपट घेऊन येत आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन महेश काळे यांनीच केले असून, ‘टर्री’ हा नवाकोरा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच याचे मोशन पोस्टर लॉन्च झाले असून यामधून प्रेक्षकांना एक अफलातून अनुभव स्क्रीनवर पाहण्यास मिळण्याचे संकेत स्पष्ट होतात. यात ललित प्रभाकर प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार असून सिनेमाचे टीझरही लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. मोशन पोस्टर आल्यापासूनच काळे यांचे चाहतेही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात हा सिनेमा असल्याचे स्पष्ट झाल्याने तरुणाईने याचे…

Read More