Author: krushiteam123

मुंबई : शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. संजय राऊतांवर टीका करताना गायकवाडांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. “चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली आहे. राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती…

Read More

मुंबई: स्वच्छ मुंबई अभियाना’निमित्त मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रायोगिक तत्वावर काही उपक्रम सुरू केले आहेत. कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांचा ओला कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र गाड्या उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. यासाठी मुंबईतील दोन प्रशासकीय विभागांची निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. हा कचरा थेट कचराभूमीवर नेला जाणार आहे. वरळीतील ५०, तर खार, वांद्रे परिसरातील १५० सोसायट्यांना ही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे. नियमित कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांना महानगरपालिकेच्या योजनेनुसार मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळू शकणार आहे. महानगरपालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली असून कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध…

Read More

पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यात काही राजकीय पक्षांनी निदर्शने देखील केली. युवक काँग्रेसकडून राजभवनासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेस, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. राज्यपाल कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असताना युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘राज्यपाल हटवा’ म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे राहुल शिरसाठ यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेत…

Read More

मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राजकीय टोलेबाजी करणारी एक कविताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनाही टोला लगावला आहे. “शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही? भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनून ऐऱ्या-गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरदपवारांनी एकदाही एखादा गड चढला नाही यात शिवरायांचा अपमान नाही?” असा सवाल या कवितेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. “शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात कार्यकर्ते शिवरायांना शरदमुखचंद्र…

Read More

मुंबई: सुषमा अंधारे यांची गुरुवारी मुलुंड येथे जाहीर सभा झाली. काहीजण ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असे लोकं आहेत, अशी टीका करत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला बांधायला पैसे कुठून आले, याबाबतही सवाल विचारले. सुषमा अंधारेंच्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारेंवर टीका करताना प्रकाश महाजनांची जीभ घसरली. सुषमा अंधारेंना बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदुला नारू झालाय का? असा सवाल महाजनांनी विचारला आहे. तसेच राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला याबद्दल विचारलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच “काल…

Read More

मुंबई: एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर ठराविक वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या पदवीच्या रचनेत आता लवचिकता येणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येही कोणत्याही वर्षी अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अवगत केलेल्या कौशल्यानुसार प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणजेच सध्याच्या शैक्षणिक रचनेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी असे शैक्षणिक टप्पे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना ठराविक काळ प्रत्येक टप्प्यासाठी द्यावा लागतो. मात्र, आता एखाद्या पदवीचे शिक्षण घेताना कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडावा लागल्यास विद्यार्थ्यांनी घेतलेले शिक्षण वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना अवगत केलेल्या कौशल्यानुसार विद्यार्थ्यांना श्रेयांक आणि अनुषंगाने प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यानुसार विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडण्याची किंवा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे.…

Read More

सोलापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूरला जाणा-या भावीकांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी ठरणार आहे. आता   सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने स्वत:चा आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नवा रेल्वेमार्ग लवकर आणि वेळेत होईल असे राज्य सरकारने सांगितले आहे. यामागे देशातील सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांना दळणवळणाने जोडण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या तीन-चार दशकांपासून केली जात होती. ती आता लवकरच पुर्ण होणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाची लांबी ८४.४४ किलोमीटर आहे. या नव्या रेल्वेमार्गादरम्यान एकूण दहा रेल्वे स्थानके उभारली…

Read More

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्योरोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही उल्लेख अजित पवारांनी केला आहे.  प्रसारमाध्यमांशी यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत.…

Read More

पुणे: भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्या जॅकवेलच्या कामात तब्बल ३० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, पाणीपुरवठा विभागप्रमुखांना घेराव घालण्यात आला. ‘प्रशासकीय राजवट हटवा, पिंपरी-चिंचवड वाचवा’ अशा विविध घोषणांनी पालिका भवन दणाणून सोडले होते. यासंदर्भात अजित गव्हाणे म्हणाले, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा १२१ कोटी रुपयांची असताना, १५१ कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप नेत्यांनी पालिका प्रशासनाशी संगनमत केले असून पालिकेची आर्थिक लूट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही…

Read More

पुणे- : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. आरटीओ अधिकारी, कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथकं जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत. ही माहिती उप परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई चे भरत कळसकर ह्यांनी दिली आहे. ते मावळमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. भरत कळसकर म्हणाले की, आरटीओ आणि महामार्गचे एकूण ३० अधिकारी जुना महामार्ग आणि पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कार्यरत राहणार आहेत. दोन्ही रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ८० टक्के वाहनचालक नियम पाळत नसल्याने अपघातात होतात. २०२१ मध्ये २०० अपघात…

Read More