Australia : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा (Australia) यष्टीरक्षक मॅथ्यू वेडवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सामन्यादरम्यान राग दाखवणे या खेळाडूला महागात पडले. 18 महिन्यांत तिसऱ्यांदा आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) हे पाऊल उचलले.
ऑस्ट्रेलियाच्या T20 विश्वचषक संघाचा भाग असलेल्या यष्टीरक्षक मॅथ्यू वेडवर(Matthew Wade) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. एकदिवसीय मार्श चषकादरम्यान मैदानात बाहेर पडल्यानंतर राग दाखवल्याबद्दल त्याला शिक्षा झाली. 18 महिन्यांत मॅथ्यू वेडने क्रिकेटचा अनादर करण्याची ही तिसरी वेळ आहे. टास्मानिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान तो बाद झाल्यावर बाहेर पडताना त्याच्या बॅटने खेळपट्टीला मारायचा. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कठोर कारवाई करत मॅथ्यू वेडला शिक्षा केली.
35 वर्षीय मॅथ्यू वेड मार्श वन डे चषकाच्या पुढील दोन सामन्यांमध्ये तस्मानिया संघाकडून खेळणार नाही. 27 सप्टेंबरला त्यांचा संघ न्यू साउथ वेल्सविरुद्ध सामना खेळणार आहे. टास्मानिया 8 ऑक्टोबरला दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही सामन्यात तो खेळू शकणार नाही.
मॅथ्यू वेडला राग का आला?
टास्मानियासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मॅथ्यू वेड व्हिक्टोरियाविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. 51 चेंडू खेळल्यानंतर त्याच्या खात्यात केवळ 25 धावा होत्या. वेगवान धावा काढण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाचा राग आऊट झाल्यानंतर दिसून आला. धावा करता आल्या नाहीत याचा राग त्याने खेळपट्टीवर बॅट आपटून व्यक्त केला. मात्र हाच राग त्याला शिक्षा देण्यास कारण ठरला. आता पुढील दोन सामने मॅथ्यू वेड खेळू शकणार नाही.