Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेतकरी-दुग्धोत्पादाकांना फटका; पहा काय घडलेय कालव्याच्या पाण्यात

औरंगाबाद : कोणत्याही धरणाचे, नदीचे किंवा कालव्याचे पाणी आवर्तन म्हणजे संबंधित लाभ क्षेत्रासाठी मोठा आधार. मात्र, आता नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यात रब्बी सिंचनासाठी सोडलेल्या पाणी आवर्तनात रसायन मिश्रित पाणी वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकरी, पशुधनासह पिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याचे पिकावर आणि दुग्धोत्पादक जनावरांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading...
Advertisement

याप्रकरणी भाजपचे डॉ. राजीव डोंगरे यांनी कालव्यातील पाण्याचा प्रवाह दूषित करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कालव्यातील पाण्याचा रंग अतिशय काळा गडद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कालव्यात काळसर रंगाचा पाणी प्रवाहाचा विसर्ग होत असल्याच्या प्रकाराला नांदूर मधमेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी दुजोरा दिला आहे. १२८ किलोमीटर लांबीच्या नांमका कालव्यातील येवला येथे पाण्याचा प्रवाह काळसर रंग स्वरुपाचा तपासणीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यातील शेवाळामुळे पाण्याचा रंग काळसर होण्याची प्राथमिक शक्यता बोलताना वर्तवली. तथापि कर्मचाऱ्यांमार्फत बाटलीत पाणी नुमने संकलीत करुन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply