Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सचिवाची अशीही कमाल..! शेतकरी सभासद व संचालकांनाही बसला मोठा झटका..!

औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी कामधेनु म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या गावोगावच्या सहकारी सोसायट्या आता भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. परिणामी इथे संचालक आणि सचिव यांचेच अच्छे दिन कायम आहेत. मात्र, पैठण येथील सचिवाने तर शेतकरी सभासद यांच्यासह संचालकांनाही मोठा झटका देण्याची किमया केली आहे.

Advertisement

तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने संचालक मंडळाला विश्वासात न घेता जास्तीचा पगार घेऊन व कर्जदार सभासदांकडून केलेल्या कर्ज वसुलीचा भरणा न करता २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परीक्षकांच्या तपासणीत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाडवर युसूफवडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीचे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे लेखा परीक्षण केले. त्यात सोसायटीचे सचिव राजेंद्र गायकवाड यांनी पदाचा गैरवापर करत ७ हजार रुपये मासिक वेतन असताना त्यांनी सोसायटीच्या संचालकांची मंजुरी न घेता १० हजार रुपयांप्रमाणे जादा वेतन घेऊन ८५ हजारांची जास्तीची रक्कम घेत अपहार केल्याचे उघड झाले आहे. तसेच कर्जदार सभासदांकडून १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वसूल केलेल्या १ लाख ८४ हजार ९०९ रुपयांची रक्कम ही जिल्हा बँकेच्या युसूफवडगाव शाखेच्या खात्यावर भरणा न केल्याचे उघड झालेले आहे.

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply