Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंनी तयारी केलीय सोलो सिनेमाची; पहा फडणवीसांबद्दल नेमके काय म्हटलेय ते

Please wait..

मुंबई : सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष एकवटला आहे. मात्र, तरीही पंकजा मुंडे यांचीही स्वतःची वेगळी ओळख आहे. भले फडणवीस गट त्यांना पाण्यात पाहत असल्याचे आरोप होत असले तरी पंकजाताई यांची ताकद आहे. त्यावरच त्यांनी आता थेट सोलो सिनेमा करून आपले कर्तुत्व सिद्ध करण्याची तयारी केली आहे.

Advertisement

दिव्य मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पत्रकार दीप्ती राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना मुंडे यांनी आत्मविश्वासाने उत्तरे दिली आहेत. २०१४ पूर्वी एकत्र काम केल्याने फडणवीस हे सहकारी असून माजी मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस असले तरी राजकीय पटलावर माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाध्यक्ष हेच नेते असल्याचे मुंडे यांनी पुन्हा एकदा म्हटलेले आहे.

Advertisement
मुलाखीतीच्या उत्तरामधील महत्वाचे मुद्दे :
आता जाणवतेय की, पुरुषप्रधानतेचा माइंडसेट असतोच. तो सगळीकडेच दिसताे. बॉलीवूडमध्येही नायिकेला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सोलो सिनेमे करावे लागतात. अनुभवातून माझेही असेच मत बनले आहे. बाई आहे म्हणून तुमच्यावर खालच्या पातळीवर टीका होते. मेरिट सिद्ध करूनही संघर्ष संपत नाही. हल्ली राजकारणाचा पोत बदलतो अाहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मला सुनावण्यात आले वगैरे वावड्या आहेत. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टीका केलेली नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे
ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व नेते ओबीसी समाजातील आहेत. मी पक्ष सोडण्याचा विषय कुणी आणला याचा शोध घ्या. मी असे कधीच म्हणाले नाही. माझ्या बुद्धीला ते पटत नाही. ऑफर तर सगळ्या पक्षांकडून होत्या. मंत्रिपदाची ऑफर होती तेव्हा. पण मुंडेसाहेबांनी जो पक्ष वाढवला, मला ज्या पक्षाने वाढवलं तो मी सोडून का जाऊ? माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही. अविरत संघर्ष करत राहीन.

 

Advertisement
Loading...

‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर कोण? भाजप खासदार स्वामी यांनीच केलाय बडा सवाल..!

Advertisement

तरीही कुरापतखोर चीनच झालाय आत्मनिर्भर; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम काही अजूनही दिसेना..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply