मुंडे-फडणवीस गटात शीतयुद्ध; पहा महाराष्ट्र भाजपमध्ये नेमके काय चालू आहे ते
नाशिक : सध्या महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षात वादंग असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले असतानाच विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येही सगळे अलबेल नाही. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटात खऱ्या अर्थाने शीतयुद्ध सुरू झालेले आहे. आता हे युद्ध पेट घेते की पेल्यातले वादळ ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची फडणवीस गटावर कृपादृष्टी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वच नेत्यांनी फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करून कामाला सुरुवात केली आहे. अशावेळी एकट्या पंकजा मुंडे याच फ़क़्त फडणवीस गटाला शह देऊ शकतील अशी ताकद असलेल्या नेत्या आहेत. त्यातच केंद्रीय भाजप आणि महाराष्ट्रातील फडणवीस गट यांनी मुंडे गटाला एकाकी टाकलेले असल्याची भावना समर्थकांची झाली आहे.
मुंबई येथे सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी ओबीसी जागर अभियानाचा बिगुल वाजला. मात्र, त्यावेळी ओबीसीचे नेतृत्व करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रण देणे महाराष्ट्र भाजपने टाळले आहे. त्यावर पंकजा मुंडे बैठकीला नव्हत्या. यातून राजकीय अर्थ काढायची गरज नाही, असे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलेले आहे.
ही बैठक प्रदेश कार्यकारिणीची होती अन् पंकजा या ‘राष्ट्रीय नेत्या’ असल्याने निमंत्रित केले नसल्याचे भाजपने सांगून टाकले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा हेच माझे नेते असल्याचे सांगताना पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांचे नाव घेणे टाळले होते, त्याचाच हा परिपाक असल्याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
‘त्या’ संकटामुळे वाजली धोक्याची घंटा; पहा कुठे झालाय हजारो पक्षांचा मृत्यू..!
पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत म्हटलेय ‘असे’; पहा काय दिशा स्पष्ट केलीय त्यांनी