Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शिक्षकांना न्यायालयाचाही झटका; दिलेत सेवा समाप्त करण्याचे आदेश..!

औरंगाबाद : शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या तरुणांची व्यथा मिटवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता नोकरीला लागूनही ही परीक्षा पास न होऊ शकलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कारण शिक्षण संचालक पुणे यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकावर न्यायालयाने शिक्कामाेर्तब केेले आहे.

Advertisement

२०१३ नंतर शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाल्यावर राज्याने डीएड, बीएड व इतर पात्र अभ्यासक्रम उत्तीर्ण व शिक्षण क्षेत्रात अध्यापनासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी कालमर्यादा निश्चित केली होती. त्यांना ३ प्रयत्नांमध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याची मुभा दिली होती. पुढे केंद्राच्या सुधारित नियमानुसार बदलही करण्यात आले. मात्र, पुरेशी संधी देऊनही काही उमेदवार परीक्षेत नापास झाले, तर अनेकजण परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने अखेरीस त्यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे.

Advertisement

शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होत नसतील तर उमेदवारांच्या सेवा समाप्तीचे परिपत्रक शिक्षण संचालक पुणे यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी काढले होते. त्यालाच अनुत्तीर्ण उमेदवार व परीक्षेला अनुपस्थित शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान देऊन सेवा समाप्त करू नयेत, अजून संधी देण्याची विनंती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी च्या सेवा तात्काळ समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply