5G Network : दूरसंचार विभाग मंगळवारी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) करणार आहे. या अंतर्गत 20 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल. शेवटी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel), अदानी डेटा नेटवर्क्स आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) यांना लिलावात भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी रिलायन्स जिओने 14,000 कोटी रुपये, अदानी समूहाने 100 कोटी रुपये, भारती एअरटेलने 5,500 कोटी रुपये आणि व्होडाफोन आयडियाने 2,200 कोटी रुपये जमा केले आहेत.
Airtel : ‘हे’ आहेत 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान; पहा, काय मिळतात फायदे.. https://t.co/cqkf5PzQML
— Krushirang (@krushirang) July 25, 2022
5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून दूरसंचार (Telecom) विभागाला 70,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. बाजार विश्लेषक म्हणतात की लिलावा दरम्यान आक्रमक बोली लावण्याची शक्यता नाही. कारण स्पेक्ट्रम पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध असताना केवळ चार बोलीदार आहेत.
Toyota Fortuner: जबरदस्त ऑफर..! फक्त 10 लाखात घरी आणा टोयोटा फॉर्च्युनर; जाणुन घ्या डिटेल्स https://t.co/y9auXEy55l
— Krushirang (@krushirang) July 23, 2022
उर्वरित हप्त्यांच्या संदर्भात भविष्यातील कोणत्याही दायित्वाशिवाय 10 वर्षांनी स्पेक्ट्रम समर्पण करण्याचा पर्याय बोलीदारांना दिला जाईल. सप्टेंबर 2021 च्या टेलिकॉम रिलीफ पॅकेजनुसार, सरकार फक्त एकवेळ स्पेक्ट्रम शुल्क आकारेल. स्पेक्ट्रम वापर शुल्क माफ करण्यात आले आहे. स्पेक्ट्रमचे पेमेंट 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये केले जाऊ शकते. दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, चंदीगड, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये प्रथम सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात लिलाव होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण होऊन 5G नेटवर्क देशात सुरू होईल. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. तरी देखील सरकार व कंपन्यांनी त्या दिशेने आता वेगाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसत आहे.