Russia-Ukraine War: रशियावर हल्ला करा! ‘या’ देशाकडून युक्रेनकडे मागणी

Russia-Ukraine War : गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांचे मृत्यू झाले मात्र तरी देखील  दोघांपैकी कोणताही देश मागे हटण्यास तयार नाही.

यातच आता युक्रेनकडे एका नाटो सदस्य असणाऱ्या देशाने रशियावर हल्ला करण्याची मागणी केली आहे.

नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एस्पेन बार्थ ईड यांनी एनआरकेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की युक्रेनने मित्र देशांनी प्रदान केलेल्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर कोणतेही निर्बंध नसावेत.

युक्रेनला दिलेली शस्त्रे अत्यंत प्रभावीपणे वापरता आली पाहिजेत, असे ते म्हणाले. मात्र, युक्रेनवर निर्बंध लादले जात आहे त्यामुळे विजय मिळवणे कठीण होते.

एस्पेन बार्थ ईदे म्हणाले, आमचा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युक्रेनला त्याच्या भूभागाच्या संरक्षणाचा भाग म्हणून रशियावर  हल्ला करण्याचा पूर्णपणे निर्विवाद अधिकार आहे. जर युक्रेनवर रशियन प्रदेशातून रशियन सैन्याने हल्ला केला, कारण त्यांच्याकडे लांब पल्ल्याची शस्त्रे आहेत, तर त्याला प्रत्युत्तर देणे शक्य झाले पाहिजे.

युद्धात हे पूर्णपणे सामान्य आहे आणि आम्ही युक्रेनला पाठीमागे एक हात ठेवून लढण्यास भाग पाडू शकत नाही. असं देखील ते म्हणाले.

Leave a Comment