ATM transaction : एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

ATM transaction : अनेकजण बँकेच्या रांगेत उभे न राहता एटीएममधून पैसे काढतात. असे केल्याने त्यांचा वेळ वाचतो शिवाय कोणताही त्रास सहन करावा लागत नाही. जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काही नियम माहिती असावेत. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

जाणून घ्या नियम

सर्व बँका RBI च्या नियमांव्यतिरिक्त पैसे व्यवहार शुल्क आकारत असतात. प्रत्येक महिन्याला 5 मोफत व्यवहारांनंतर, पंजाब नॅशनल बँक 21 रुपयांव्यतिरिक्त 9 रुपये कर आकारत आहे. 5 मोफत व्यवहारांनंतर, एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी 10 रुपये आणि इतर एटीएममधून 20 रुपये आकारण्यात येतात. HDFC आणि ICICI मेट्रो शहरात 3 आणि इतरत्र 5 व्यवहारांनंतर 21 रुपयांव्यतिरिक्त 8.5 रुपये आकारण्यात येतात.

नोटा बदलण्याची प्रक्रिया

एटीएममधून पैसे काढल्यानंतर फाटलेल्या नोटा सापडल्या तर ज्या बँकेशी एटीएम लिंक आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही त्या बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागेल. यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि ज्या एटीएममधून पैसे काढले जातात त्याचा तपशील देणे गरजेचे आहे. तपशिलांची पडताळणी झाल्यानंतर बँक नोट बदलून देईल.

बनावट नोट सापडल्यास काय करावे?

एटीएममधून बनावट नोटा बाहेर काढल्या गेल्या तर त्या बाजारात चालवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बनावट नोटा आणि पावत्या बँकेत घेऊन जा. तपासानंतर बँक नोट बदलून देईल. समजा जास्तीची रोकड काढली गेल्यास आरबीआय इश्यू ऑफिसमधून नोटा बदलल्या जातील.

जाणून घ्या RBI चे नियम

आरबीआयच्या नियमांनुसार तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेतून किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून नोटा सहज बदलू शकता. RBI च्या नियमांनुसार, तुम्ही एकावेळी 5 हजार रुपयांच्या फक्त 20 नोटा बदलता येतील. ज्या नोटा मोठ्या प्रमाणावर फाटलेल्या किंवा जळलेल्या आहेत त्या नोटा बँक बदलत नाही. अशा नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करण्यात येतात.

SBI चे नियम

एसबीआयच्या एटीएममध्ये नोट शॉर्टनिंग मशीनद्वारे तपासल्यानंतर नोटा टाकण्यात येतात. अशा वेळी नोटा खराब होण्याची शक्यता कमी आहे. असे असतानाही जर नोटा खराब झाल्यास बँकेच्या शाखेतून नोटा बदलून घेता येतील. नियमांनुसार, जर कोणी नोटा बदलून घेण्यास नकार दिल्यास 10,000 रुपये दंड आकारण्यात येतो.

Leave a Comment