ATM transaction : अनेकजण बँकेच्या लांबलचक रांगेत उभे राहत नाही, ते ATM चा वापर करतात. ATM मुळे ग्राहकांची अनेक कामे सोयीस्कर होतात. पण अनेकदा ATM व्यवहार अयशस्वी झाला तर ग्राहकांवर आर्थिक संकट येते. अशावेळी आता बँक तुम्हाला पैसे देते, कसे ते जाणून घ्या.
केली जाईल नुकसानभरपाई
तुमच्या खात्यातून डेबिट केलेली रक्कम बँकेने निर्धारित वेळेत परत केली नाही तर नुकसानभरपाईची तरतूद केली जाते. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेला ७ दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करणे गरजेचे असते. समजा तुम्ही या कालावधीत बँकेने समस्येचे निराकरण केले नाही तर तुम्हाला प्रतिदिन १०० रुपये भरपाई द्यावी लागते.
जाणून घ्या आरबीआयचे नियम
- ज्यावेळी ग्राहकाचा व्यवहार अयशस्वी होतो आणि खात्यातून पैसे कापले जातात, त्यावेळी कापलेली रक्कम ताबडतोब बँकेत परत करणे गरजेचे असते.
- तक्रार दाखल केल्यापासून ७ दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करणे गरजेचे असते.
- सात दिवसांनंतरही पैसे मिळाले नाही तर बँकेला प्रतिदिन १०० रुपये भरपाई द्यावी लागते.
- इतकेच नाही तर बँकेकडून दंड वसूल करण्यासाठी ग्राहकाला ३० दिवसांच्या आत तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. त्यानंतर तक्रार केली तर नुकसान भरपाई मिळत नाही. ट्रान्झॅक्शन स्लिप किंवा खात्याचे स्टेटमेंट बँकेला द्यावे लागते.
- हे लक्षात घ्या की 7 दिवसांच्या आत पैसे परत केले नाही तर ग्राहकाला संलग्नक-5 फॉर्म भरावा लागेल.
- तसेच तुम्ही ज्या दिवशी हा फॉर्म भराल त्या दिवसापासून ग्राहकाचा दंड सुरू होतो. म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर १० दिवसांच्या आत पैसे परत केले नाही तर बँक तुम्हाला १०० रुपये प्रतिदिन या दराने १००० रुपये भरपाई देईल.