ATM : एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर खाते रिकामे झालेच समजा

ATM : जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना काही गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर तुमचे खाते रिकामे झालेच समजा.

फसवणूक करणारे ATM मध्ये येणाऱ्या लोकांचे पासवर्ड आणि कार्डचे इतर तपशील सहजपणे पाहून फसवणूक करतात. तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाल तेव्हा काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, यामुळे सायबर फ्रॉडचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

ज्यावेळी तुम्ही मशीनमध्ये कार्ड घालण्यासाठी जाल तेव्हा स्लॉटच्या प्रकाशाचा रंग तपासा. प्रकाशाचा रंग हिरवा असेल तर ठीक आहे पण लाल दिवा असेल किंवा लाईट नसेल तर कार्ड तिथे लावू नका. स्लॉट लूज असला तरी तेथे कार्ड टाकू नका. मुख्य स्लॉटवर एक डमी स्थापित केला गेला आहे. तुमची कार्ड माहिती चोरली जाऊ शकते. आजकाल ही पद्धत खूप लोकप्रिय असून याला कार्ड क्लोनिंग म्हणतात, हे लक्षात घ्या.

पिन नंबर हाताने झाका

कार्ड क्लोन केल्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांना पिन क्रमांक गरजेचा असतो जेणेकरून ते व्यवहार करू शकतील. आता हे करण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे फसवणूक करणारा जो, तुमच्या मागे उभा राहून तुम्हाला पिन क्रमांक टाकताना पाहतो, दुसरा मार्ग म्हणजे सीसीटीव्ही हॅक करून त्याद्वारे तुमचा पिन जाणून घेणे. त्यामुळे, पिन टाकत असताना तुम्ही तो तुमच्या दुसऱ्या हाताने झाकून ठेवावा.

फसवणूक झाले तर काय करावे?

एटीएममध्ये कोणाची फसवणूक झाली असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. फसवणूक करणाऱ्यांच्या बोटांचे ठसे मशिनवर मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांचे आधीच गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर ते लवकर पकडले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची तक्रार सायबर सेलकडेही नेऊ शकता. त्यामुळे तुम्ही सावध राहणे फार महत्वाचे आहे.

Leave a Comment