ATM Cash Withdrawal : अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे अनेक कामे सोयीस्कर होतात. वेळेची खूप बचत होते. जर तुम्ही एटीएममधून पैसे काढणार असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एटीएम फसवणुकीशी संबंधित दररोज काही नवे प्रकरण समोर येत असून जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण फसवणूक करणारे लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक डावपेच अवलंबत असतात. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढत आहात ते सुरक्षित आहे की नाही हे तपासणे खूप गरजेचे आहे.
हॅकर्स काय करतात?
फसवणूक करणारे एटीएम मशिनमधील कार्ड स्लॉटमधून डेटा चोरतात. हॅकर्स एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये एक उपकरण स्थापित करून तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करून घेतात.
असे राहा सुरक्षित
हे लक्षात घ्या की तुमच्या डेबिट कार्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, हॅकरकडे तुमच्या कार्डचा पिन क्रमांक असावा. हे साध्य करण्यासाठी फसवणूक करणारे एटीएममध्ये कॅमेरा बसवत असतात. हे टाळण्यासाठी ज्यावेळी तुम्ही एटीएममध्ये तुमचा पिन क्रमांक टाकाल त्यावेळी तो एका हाताने लपवा. जेणेकरून त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार नाही.
इतकेच नाही तर ज्यावेळी तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाल तेव्हा एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट काळजीपूर्वक तपासून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की एटीएम कार्डचा स्लॉट सैल आहे किंवा इतर काही समस्या आहे तर ते वापरणे टाळावे.
हिरवी लाइट तपासावी
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कार्ड स्लॉटमध्ये कार्ड घालत असताना, त्यावरील प्रकाश काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. जर स्लॉटमध्ये हिरव्या रंगाची लाइट असेल तर एटीएम सुरक्षित आहे. पण जर त्यात लाल किंवा इतर कोणतीही लाइट पाहायला मिळत नसेल तर काळजी घ्या, कारण यामुळे तुम्ही फसवणुकीचे बळी होऊ शकता.