ATM card : तुमच्याकडेही असेल एटीएम कार्ड तर तुम्हालाही घेता येईल 5 लाखांचा लाभ

ATM card : सध्याच्या काळात जवळपास सगळ्यांकडे एटीएम कार्ड आहे. जर तुमच्याकडेही एटीएम कार्ड असेल तर तुम्हालाही लाखो रुपयांचा फायदा होईल. यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही.

सर्वात आनंदाची बाब म्हणजे एटीएम कार्डवर ग्राहकांना 25 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे विम्याचे लाभ मिळत आहेत. ज्याबद्दल सामान्य लोकांना माहिती नसते. यामुळे त्यांना या लाभाचा लाभ घेता येत नाही.

कोणाला मिळतो लाभ?

हे लक्षात घ्या की एटीएम कार्ड विम्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळतो जे किमान 45 दिवस हे एटीएम कार्ड वापरतात. कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी बँकेच्या एटीएम कार्डमध्ये ही सुविधा मिळते. इतकेच नाही तर तुमचे एटीएम कार्ड कोणत्या श्रेणीचे आहे यावरही तुम्हाला किती विम्याचा लाभ मिळणार आहे.

विविध कार्डांनुसार कव्हरेज

एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरवण्यात येते. क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, ऑर्डिनरी मास्टर कार्डवर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये आणि व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. शिवाय प्रधानमंत्री जन धन खात्यांवर रुपे कार्ड उपलब्ध आहे. ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो.

असा करा दावा

एटीएम कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर कार्डधारकाच्या नॉमिनीला त्या व्यक्तीचे खाते असणाऱ्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तेथे भरपाईसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. बँकेत आवश्यक कागदपत्रे जमा केल्यास नामनिर्देशित व्यक्तीला विमा दावा मिळतो. बँकेचे एटीएम कार्ड वापरल्यानंतर ४५ दिवसांच्या आत मृत्यू किंवा अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीचे आश्रित विमा पॉलिसी अंतर्गत नुकसानभरपाईचा दावा करता येतो.

Leave a Comment