ATM Card: आजच्या काळात अनेक जण ऑनलाइन व्यवहार करत आहे. UPI द्वारे लोक पेमेंट करताना दिसत आहे.
यामुळे ग्राहकांना आरबीआय सह अनेक बँका विविध सुविधा देत आहे. असेच एका सुविधा बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या सुविधाचा फायदा घेतो तूम्ही एटीएम कार्ड शिवाय एटीएममधून पैसे काढू शकतात.
एटीएम नसतानाही तुम्ही कुठूनही पैसे काढू शकता. तेही फक्त UPI द्वारे. अनेक बँका आता कार्डलेस व्यवहाराची सुविधाही देतात. तुम्हाला रोखीची गरज असतानाच नाही तर चुकीच्या पिनमुळे व्यवहार अवरोधित केल्यावर किंवा कार्ड हरवल्यावरही तुम्ही पैसे काढू शकता.
एटीएमशिवाय पैसे काढण्याचे मार्ग
तुम्ही ऑनलाइन व्यवहारांसाठी कोणतेही अॅप वापरता, ते तुमच्या फोनवर इन्स्टॉल केलेले असावे. तसेच, त्यावेळी तुमचे नेट कनेक्शनही चालू असावे. तुम्ही फोनवर BHIM app, Paytm, Gpay किंवा काहीही वापरू शकता.
तुम्हाला एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्याचा पर्याय निवडावा लागेल.
हा पर्याय निवडल्यानंतर, मशीन तुम्हाला आणखी काही पर्याय दाखवेल. त्यातून तुम्ही UPI पर्याय निवडा.
हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमध्ये क्यूआर कोड दिसेल.
तुम्ही जे अॅप वापरता ते उघडा आणि तो QR कोड स्कॅन करा.
स्कॅन केल्यानंतर तुम्हाला रक्कम विचारली जाईल.
तुम्ही ती रक्कम निवडा. तो दिसेल तेव्हा पुढे जा पर्याय निवडा.
UPI पिन विचारल्यावर तो पिन टाका. यानंतर तुम्ही रोखीचे व्यवहार करू शकाल.