Ather 450S: भारतीय बाजारपेठेमध्ये आज पेट्रोल स्कूटरसह इलेक्ट्रिक स्कूटर्सना देखील जबरदस्त मागणी प्राप्त झाली आहे. यामुळे आता भारतीय बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त रेंजसह आणि फीचर्स येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होताना दिसत आहे.
यातच जर तुम्ही देखील कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स आणि बेस्ट रेंजसह येणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बाजारात धुमाकूळ घालणारी Ather ची 450S आणि 450X इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या 25 हजारात घरी आणू शकतात.
होय, या दोन्ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटरवर एक दमदार फायनान्स प्लॅन सादर करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पंचवीस हजार डाऊन पेमेंट भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकतात.
Ather 450X फायनान्स प्लॅन
कंपनीने Ather Energy ची ही 3.7kwh थर्ड जनरेशन व्हेरिएंट इलेक्ट्रिक स्कूटर 1.29 लाख रुपये आणि 1,34,240 रुपये ऑन-रोड किमतीसह बाजारात लॉन्च केली आहे. तथापि, जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल तर तुम्ही 109290
रुपयांच्या कर्जावर 25,000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह ही स्कूटर घरी घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला 3 वर्षांसाठी 9% व्याज दराने 36 महिन्यांसाठी 3,475 रुपये मासिक EMI भरावे लागेल.
Ather 450S फायनान्स प्लॅन
कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर 1.18 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 1,22,920 रुपयांसह बाजारात आणली आहे. तथापि, जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर तुम्ही ते रु. 97,920 च्या कर्जावर रु. 25,000 च्या डाउन पेमेंटसह ही स्कूटर घरी घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला 3 वर्षांसाठी 9% व्याज दराने 36 महिन्यांसाठी 3,114 रुपये मासिक EMI भरावे लागेल. मात्र, या कालावधीत तुम्हाला 14 हजार रुपये व्याज द्यावे लागणार आहेत.