Atal Pension Yojana: जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल आणि तुमच्या भविष्याचा विचार गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकार एक जबरदस्त योजना राबवत आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. चला मग जाणून घ्या या जबरदस्त योजनेबद्दल सविस्तर माहिती.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. सरकारकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना वृद्धापकाळात पैशाची किंवा उत्पन्नाची समस्या येऊ नये. करोडो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत .
केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती परंतु आजही बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळेच लोकांना त्याचा फायदा घ्यायचा असूनही घेता येत नाही. सरकारने ही योजना कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी सुरू केली आहे. याशिवाय पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDA ने APY बाबत एक परिपत्रक जारी केले आहे ज्या अंतर्गत तुम्ही त्यासाठी पात्रता तपासू शकता.
तुम्हालाही या योजनेत सामील व्हायचे असेल आणि गुंतवणूक सुरू करायची असेल, तर तुम्हाला दररोज 7 रुपये जमा करावे लागतील, म्हणजे दरमहा 210 रुपये. त्यानंतर, तुमचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 5000 रूपये पेन्शन मिळू लागतील.
मृत्यू नंतर देखील फायदे
अटल पेन्शन योजनेची खासियत अशी आहे की, तुम्ही जिवंत असताना तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शनचा लाभ मिळतो, परंतु तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये अर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याची पत्नीही या योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ घेऊ शकते.
परंतु 60 वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. एवढेच नाही तर, नॉमिनी म्हणून पत्नी देखील ग्राहकाच्या मृत्यूनंतर एकरकमी रकमेचा दावा करू शकते. याशिवाय पती-पत्नी यामध्ये संयुक्त खातेही उघडू शकतात. यामुळे त्यांना दुप्पट फायदा होईल. अशा परिस्थितीत ते दरमहा 10,000 रुपये पेन्शन घेऊ शकतील.