Atal Pension Yojana : केंद्र सरकारने (Central government) अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) बदल केले आहेत. नवीन बदलांनंतर आता अनेकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नावाने सुरू झालेल्या या पेन्शन योजनेत सरकारने अनेक बदल केले आहेत. या बदलानंतर आयकर भरणारे लोक त्याच्या कक्षेबाहेर होतील. या योजनेंतर्गत खातेदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 1 हजार ते 5 हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. नियमातील बदल जाणून घ्या.
1. आयकर भरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही
नवीन नियमानुसार जे लोक आयकराच्या कक्षेत येतात किंवा कर भरतात. ते 1 ऑक्टोबर 2022 नंतर अटल पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडू शकणार नाहीत. नुकतीच वित्त मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
2. आयकर भरणाऱ्यांना अजूनही संधी आहे
तुम्ही आयकर जमा करता आणि तुम्हाला अटल पेन्शन योजनेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही या योजनेत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत खाते उघडू शकता. कारण नवीन नियमानुसार 1 ऑक्टोबर 2022 पासून आयकर भरणारे या योजनेत खाते उघडू शकणार नाहीत. तथापि, आपण खाते उघडण्यासाठी अर्ज केल्यास, अर्ज रद्द केला जाईल.
SBI: ग्राहकांसाठी खुशखबर..! एसबीआय चेअरमनने केली ‘ही’ मोठी घोषणा https://t.co/OSdvuGvdjb
— Krushirang (@krushirang) August 17, 2022
3. आयकरदात्याने खाते उघडले तर?
ज्यांनी आधीच खाते उघडले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. जर अटल पेन्शन योजना खाते 1 ऑक्टोबर नंतर उघडले असेल आणि ती व्यक्ती आधीच आयकर भरत असेल, तर त्याचे खाते बंद केले जाईल.
4. खाते बंद केल्यास जमा झालेल्या पैशाचे काय होईल
30 सप्टेंबरनंतर जर आयकरदात्याने अटल पेन्शन योजनेत खाते उघडले, तर खाते बंद केल्यानंतर त्याने जमा केलेले पैसे त्याला परत केले जातील.
Aadhaar Card : आधार कार्डवर मिळणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज! WhatsApp वर मेसेज व्हायरल; जाणुन घ्या सत्य https://t.co/x7yKqloN0S
— Krushirang (@krushirang) August 17, 2022
5. अटल पेन्शन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो
अटल पेन्शन योजनेनुसार, 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत बँकेत खाते उघडून कोणीही या योजनेचा भाग बनू शकतो. मार्च 2022 पर्यंत 4 कोटींहून अधिक लोक अटल पेन्शन योजनेचा भाग बनले आहेत.