Assembly Elections । राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता अजित पवार गटाने भाजपपुढे सर्वात मोठी मागणी ठेवली आहे. यावर भाजप कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, “80 जागांवर निवडणूक लढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. 100 टक्के निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात कोणती जागा लढवणार? या प्रश्नावर आत्राम म्हणाले की, त्यासंदर्भात पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. विदर्भातील 20 जागांवर निवडणूक लढवण्याचा पक्षाचा विचार आहे. विदर्भात सहा जागांवर आमचे आधीच आमदार आहेत.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात किमान एका जागेवर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आत्राम यांनी सांगितले. ज्या जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार प्राधान्य असतील त्या जागांवर आम्ही निवडणूक लढवू. अजित पवार यांच्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात खास प्लॅन असल्याचा खुलासा आत्राम यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यास देशमुख घराण्यातीलच तगडा उमेदवार आमच्याकडे आहे.
देशमुख घराण्यातील राष्ट्रवादीत कोण येणार?
हे लक्षात घ्या की सध्या देशमुख घराण्यातील कोणीहीआमच्या पक्षात नसले तरी निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. देशमुख कुटुंबातील त्या व्यक्तीला आमच्या पक्षात सामावून घेऊन उमेदवारी दिली जाईल, असा दावा आत्राम यांनी केला आहे.