Assembly elections 2024 । राज्याच्या राजकारणाची बदलणार समीकरण! संभाजीराजे आणि बच्चू कडू येणार एकत्र?

Assembly elections 2024 । राज्यात काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीकडून महायुतीला मोठा धक्का सहन करावा लागला. अशातच आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत.

अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जर हे दोन्ही नेते एकत्र आले तर स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना आणि राज्यातील अनेक छोटे-मोठे घटकपक्ष मिळून एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते. याचा परिणाम आगामी निवडणुकीती होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, सर्व राजकीय नेत्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment