Assembly Election । मोठी बातमी! विधानसभेपूर्वी काँग्रेसला सहन करावा लागणार झटका, नेमकं कारण काय?

Assembly Election । काही महिन्यांच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणुका ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग, आऊटगोईंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली असून अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची नांदेड जिल्ह्यात चर्चा आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीतील भाजपाच्या कामगिरीनंतर देशात एक ‘फेक नरेटिव्ह’ हा शब्द सतत ऐकायला मिळत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर अबकी बार 400 पार केल्यानंतर घटना बदलणार अशी वक्तव्य केली होती. त्यानंतर भाजपाने असे काही होणार नसल्याचा दावा केला. पण कॉंग्रेसने हा प्रचाराचा मुद्दा बनविला. भाजपाने कॉंग्रेसने घटना बदलणार असे फेक नरेटिव्ह पसरवले असल्याने आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाही असा दावा भाजपा नेत्यांनी करायला सुरुवात केली. पण आता प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाचे फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी नवीन टिमच जाहीर केली आहे.

सत्ताधारी पक्षाकडून ‘फेक नेरेटिव्ह’ पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले असून आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो,व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवित आहे. जनतेला सत्य समजावे आणि सत्ताधाऱ्यांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 15 नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment