Assembly Election 2024 । पडद्यामागं नेमकं काय चाललंय? महाविकास आघाडीच्या बैठकीनं वाढलं महायुतीचे टेन्शन

Assembly Election 2024 । मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येणारा काळ हा राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी महत्त्वाची माहिती मिळत आहे.

  • लवकरच राज्यभरातील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा आयोजित केला जाणार आहे. याच मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असं बैठकीत ठरलं असल्याचे समोर आले आहे.
  • 12 जुलैला पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे.
  • तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या संदर्भात देखील प्राथमिक चर्चा झाली.
  • सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लवकरच जागा वाटपाच्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. असे असले तरीही महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत आता कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल. महाविकास आघाडीच्या बैठकीनं पुन्हा एकदा महायुतीचे टेन्शन वाढलं असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Comment