Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) आजपासून (27 ऑगस्ट) सुरू होत आहे. आशिया चषकाचा पहिला सामना आज (शनिवार) अफगाणिस्तान आणि श्रीलंका (Afghanistan vs Srilanka) यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हाय-व्होल्टेज ड्रामा होणार आहे. दोन्ही देशातील नागरिकांसह जगभरातील क्रिकेट चाहते (Cricket Fans) या सामन्याची वाट पाहत आहेत. दोन्ही संघांचे खेळाडूही या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. सामना जिंकण्यासाठी दोन्ही देशांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, असे काही लोक आहेत ज्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायचा आहे, परंतु त्यांच्याकडे चॅनेल किंवा अॅपची सदस्यता नाही. या बातमीत आम्ही सांगणार आहोत की तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विनामूल्य कसा पाहू शकता.
द्राक्ष म्हणजे अहा..हा.. भन्नाट आंबट-गोड अन् चवदार..
🍇🍇🍇🍇
द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात सहभागी होऊन वाढवा शेतीचा गोडवा..#द्राक्ष #grapes pic.twitter.com/nUCYFFJZtb— Krushirang (@krushirang) August 26, 2022
याप्रमाणे भारत विरुद्ध पाक सामना विनामूल्य पहा
आम्ही तुम्हाला सांगतो की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हॉटस्टार अॅप (hotstar) आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star sports network) दाखवला जाईल. भारत विरुद्ध पाक सामना भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. ज्यांच्याकडे हॉटस्टार अॅप किंवा स्टार स्पोर्ट्सचे मेंबरशिप नाही ते डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनलवर फ्री डीसीएच (डीडी फ्री डिश) वर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विनामूल्य पाहू शकतात.
भारत विरुद्ध पाक सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आशिया कप 2022 चा भारत विरुद्ध पाक सामना हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल , रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
Share Market : दिलासा…! आता शेअर मार्केटमध्ये होणार नाही नुकसान ; सेबीने घेतला ‘तो’ मोठा निर्णय https://t.co/CtUAhKbFqh
— Krushirang (@krushirang) August 26, 2022
आशिया चषक 2022 साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.