Asia Cup 2023 : आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने रोहित शर्मा आणि कंपनीला इशारा दिला आहे. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना वकार म्हणाला की, पाकिस्तानचा नवा संघ आधीच्या संघांपेक्षा मोठ्या सामन्यांचे दडपण हाताळण्यासाठी सज्ज आहे.
2021 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. यावेळीही पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकतो, असे वकारचे म्हणणे आहे. कारण पाकिस्तानी संघात टीम इंडियापेक्षा जास्त मॅच विनर्स आहेत.
वकार युनूसने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतापेक्षा चांगले दबाव हाताळल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूंच्या सध्याच्या पिढीचे कौतुक केले. वकारने क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, “आमच्या काळात दबाव इतका मोठा प्रश्न नव्हता जितका आता वाटतो. तुम्ही एखाद्या संघाविरुद्ध जितके कमी खेळाल, तेही मोठ्या संघाविरुद्ध .
विशेषत: जर ते भारत आणि पाकिस्तान यांच्यात असेल, तर दबाव तिप्पट असेल. कदाचित आमच्या काळात ते तुलनेने कमी होते कारण आम्ही आमच्या सुरुवातीच्या काळात भरपूर क्रिकेट खेळायचो. पण तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो. तरीही, मी म्हटल्याप्रमाणे, आजकाल खेळाडू नक्कीच दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहेत.
वकास युनूस पुढे म्हणाला, “पाकिस्तान संघात अनेक सामने जिंकणारे खेळाडू आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि सलामीवीर फखर जमान हे स्वबळावर जिंकू शकतात आणि त्यांचा भारतासोबत चांगला रेकॉर्ड आहे. शाहीन-फखर चमत्कार करू शकतात. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 3 सामने खेळले जाऊ शकतात.