Asia Cup 2023 : आशिया चषक 30 (Asia Cup 2023) ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ (Nepal) यांच्यात होणार आहे. जवळपास सर्वच संघ आता जाहीर झाले आहेत. भारत (India) आणि पाकिस्तानसह (Pakistan) नेपाळचा संघ अ गटात आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ ब गटात आहे. अनेक संघ नेपाळच्या संघाला हलकेच घेत असावेत. पण नेपाळ हलक्या संघांपैकी नाही. त्यांनी गेल्या काही वेळा मोठ्या संघांना पराभूत केले आहे.
यंदाच्या क्वालिफायर (Asia Cup 2023) सामन्यांमध्ये नेपाळने चमकदार कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात त्यांनी यूएई संघाचा 7 गडी राखून पराभव केला. नेपाळ यंदाचा पहिला आशिया कप खेळणार आहे. यापूर्वी नेपाळचा संघ या स्पर्धेसाठी कधीही पात्र ठरू शकला नव्हता. नेपाळ संघाची कामगिरी काही काळापासून उत्कृष्ट आहे. नेपाळने UAE विरुद्ध 50 ओव्हरर्सच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत. दोन्ही संघांमध्ये गेल्या 6 वर्षात एकूण 15 सामने झाले आहेत. ज्यामध्ये नेपाळच्या संघाने एकूण 9 विजय मिळवले आहेत.
यूएई व्यतिरिक्त नेपाळच्या संघाने स्कॉटलँड आणि नेदरलँड्सचाही पराभव केला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी एक सामना नेपाळने जिंकला आहे. त्याचबरोबर स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात त्याने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. नेपाळच्या संघाने नामिबिया, यूएई आणि अमेरिका या संघांनाही पराभूत केले आहे. अशा स्थितीत भारताला नेपाळ संघाबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
आशिया चषक 2023 साठी नेपाळचा संघ
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, भीम शार्की, दीपेंद्र सिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, मौसम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद