Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम (Asia Cup 2023) सामना 17 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात होईल. कोलंबोतील खराब हवामानामुळे अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास हा सामना 18 सप्टेंबरला होणार आहे. उल्लेखनीय आहे की आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) भारत (Team India) आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला होता. यावेळी एसीसीने एक निवेदन जारी केले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यात जर पाऊस पडला तर सामना ज्या ठिकाणी थांबला होता त्याच ठिकाणी राखीव दिवशी सामना खेळवला जाईल.
अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस
ACC ने निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुपर-4 च्या या एकमेव सामन्याशिवाय कोलंबो येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. पावसामुळे सामना थांबला तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी खेळवला जाईल. एसीसीने दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस जाहीर केला होता.
आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारताने पहिल्यांदा पाकिस्तानचा मोठा पराभव केला होता. राखीव दिवशी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 सप्टेंबरला भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 11व्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
त्याचबरोबर सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर त्याला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या सामन्यात सामना पाकिस्तानशी होता. या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या बॉलवर पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करत 13व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका (IND vs SL फायनल) यांच्यात होईल. कोलंबोतील खराब हवामानामुळे अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास हा सामना 18 सप्टेंबरला होणार आहे. उल्लेखनीय आहे की आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला होता. यावेळी एसीसीने एक निवेदन जारी केले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यात जर पाऊस पडला तर सामना ज्या ठिकाणी थांबला होता त्याच ठिकाणी राखीव दिवशी सामना खेळवला जाईल.
अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवसअंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस