Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चे काउंटडाउन सुरु झाले आहे. आज म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखाली संघ निवड बैठक झाली, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) देखील उपस्थित होते. या बैठकीत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे, तर हार्दिक पांड्याला (Hardik pandya) संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच तिलक वर्मा (Tilak Varma) यालाही संधी मिळाली आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहलला आशिया चषकासाठी संघात स्थान मिळालेले नाही.
आशिया कप स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवली जाणार आहे. याअंतर्गत यजमान पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जातील, तर फायनलसह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होतील. भारतीय संघ श्रीलंकेत आपले सामने खेळणार आहे. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाणार आहे.
असा आहे भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह, शमी, सिराज, प्रसिद्ध कृष्ण.