KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात
    • Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती
    • BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती
    • Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात
    • GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती
    • Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही
    • Life’s Meanings| जीवन म्हणजे…
    • Turmeric Side Effects: “या “ लोकांनी हळदीचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकते घातक
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
    KRUSHIRANG
    Home»अहमदनगर»Ashok Stambh: फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची
    अहमदनगर

    Ashok Stambh: फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची

    superBy superJuly 13, 2022No Comments3 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Ashok Stambh: सध्या सेंट्रल व्हिस्टा अर्थात नव्या संसद भवनाच्या (Central Vista, the new parliament building) बांधकामाने गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमला (Prime Minister Narendra Modi’s team) देशात ‘नवा भारत’ (new India) घडवताना जुने बासनात गुंडाळायचे आहे. वेळोवेळी ते स्पष्ट झालेले आहे. आताही “आपल्याकडे सध्या फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची” (changing the posture of the lion on the Ashoka pillar) असे लेखक आणि सामाजिक अभ्यासक श्रीकांत आव्हाड (Writer and social scholar Shrikant Awhad) यांनी त्यांच्या फेसबुकवर एक सविस्तर पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही ही जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत.

    https://www.facebook.com/photo/?fbid=5785285731538060&set=a.139664719433551

    आपल्याकडे सध्या फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची… शिवाजी महाराजांचा शांत संयमी धीरगंभीर चेहरा आजकाल रागीट दिसायला लागला आहे, संभाजीराजांचा आत्मीविश्वासपूर्वक आणि आक्रमक असणारा पारंपरिक चेहरा आता क्रूरतेकडे झुकायला लागला आहे, हनुमानाच्या चेहऱ्यावर आता समाधानी शांतता न दिसता आठ्या पडलेल्या दिसायला लागल्या आहे, रामाच्या बाबतीतसुद्धा आता हेच होताना दिसायला लागलं आहे, अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतील… आपले चिडके, रागीट, क्रूर व्हायला लागलेले स्वभाव हळूहळू या महापुरुषांच्या चेहऱ्यावर यायला लागले आहेत, कारण त्यांचे चित्र आपण बनवतोय, त्यामुळे आपलीच वृत्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली आहे. साहजिक, सेंट्रल व्हिस्टावरील अशोकस्तंभासारखे बनवलेले सिंह रक्ताला चाटवल्यासारखे बनवले जात असतील तर त्यात काही वावगे नाही.

    Ration Card New Rules: रेशनकार्डचा नवा नियम आला, ताबडतोब सरेंडर करा नाहीतर सरकार वसूल करणार! https://t.co/hTrLfnOjOB

    — Krushirang (@krushirang) July 13, 2022

    हा अशोकस्तंभ नाहीये. सेंट्रल व्हिस्टावर उभारलेली चार सिंहांची अशोकस्तंभासारखी दिसणारी प्रतिमा अशोकस्तंभ नाहीये.  कपाळावर आठ्या असणाऱ्या, सतत चिडचिड करणाऱ्या माणसाच्या जवळ कुणीच जात नाही, त्याच्याशी कुणीच कसलेही संबंध ठेवत नाही… इथे रागीट डोळे असणारे, रक्ताला चटावलेले, क्रूर सिंह दाखवून त्याला अशोकस्तंभ म्हणायचे? काय साध्य होणार आहे? अशोकस्तंभ हि काल्पनिक गोष्ट नाहीये कि कुणीही आपल्या मनाप्रमाणे तयार करावी, आणि त्यामध्ये आपल्याला हवे तसे भाव चितारावेत… अशोकस्तंभ हा सम्राट अशोकने उभारलेला चार सिंहांचा समूह असणारा स्तंभ आहे जो आपण राष्ट्रीय प्रतीक म्हणून जसाच्या तसा कोणताही बदल न करता स्वीकारलेला आहे. त्याला अशा रक्ताला चटावलेल्या चेहऱ्याचे स्वरूप देणे विकृती आहे. हा चार सिंहांचा पुतळा अशोकस्तंभ नाही. हा अशोकस्तंभासारखा दिसणारा एक पुतळा आहे फक्त. मूळ अशोकस्तंभ आणि हा पुतळा शेजारी शेजारी ठेवला तर मूळ स्तंभातली अदब कुठेतरी हरवून त्याजागी बळजबरी दाखवली जात असलेली क्रूरता दिसून येईल.

    Ashok Stambh: बामणी भाषेत बोलायचं तर ‘विचकट’ आणि ‘हिडीस’ https://t.co/KuJ35qyZf9

    — Krushirang (@krushirang) July 13, 2022

    प्रतीकात्मक गोष्टी आणि प्राण्यांचे फोटो किंवा चित्र यातला फरक सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. प्रतीकात्मक गोष्टींमध्ये चित्र वाटावे असे हावभाव नसतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. उद्या राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाचा पुतळा लावायचा असेल तर आपण त्याला हुभेहूब रागीट चेहऱ्याचा बनवू शकतो, पण तो प्रतीक म्हणून वापरायचा असेल तर त्यातून विविध अर्थ अभिप्रेत असतात त्यानुसार तो बनवला जातो. याच प्रकारे अशोकस्तंभाकडे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. अशोककस्तंभ हा सिंहाचा पुतळा दाखवायचं काम करत नाही, तर तो त्यामाध्यमातून विविध प्रतीकांचं प्रकटीकरण करतो. यासोबत त्याखाली असणारे बैल, घोडा यासारखे प्राणी सुद्धा विविध अर्थ सांगण्याचे काम करतात. ते जसेच्या तसे दिसायला ते चित्र नाहीये. ती प्रतीकात्मक कलाकृती आहे.

    Free Ration Update: मोफत रेशन मिळण्यात अडचण? तर घरी बसून करा तक्रार; गहू-तांदूळ पोहोचणार घरी https://t.co/dSEBFqGND5

    — Krushirang (@krushirang) July 13, 2022

    सम्राट अशोकचे चार सिंह हे सांगतात कि आम्ही शांत आहोत, पण सिंह शांत आहे म्हणून त्याला डिवचयाचे नसते, तर त्याला आदरच द्यायचा असतो. हे प्रतीक आहेत सामर्थ्याचे, ताकदीचे, आदराचे, सन्मानाचे… (अशोकस्तंभामध्ये सुद्धा रागीट सिंह आहे, पण तोसुद्धा चांगलाच वाटतो, त्याच्याकडे बघून दुसरीकडे बघायची इच्छा होईल असा तो नाहीये) अशोकस्तंभामध्ये असलेले सिंह आपल्याला त्यासमोर अदबीने झुकायला भाग पाडतात तर हे नवे सिंह तुम्ही आमच्याकडे याला तर तुमचा फडशाच पाडला जाईल एवढंच सांगण्याचे काम करत आहेत. आपल्याला आपल्याच राष्ट्रीय प्रतीकांकडे बघून भीती वाटायला लागली आहे अशी अवस्था झाली आहे. काहीही झालं कि ‘ये नया भारत हे’ म्हणणारे एक भलतेच वाढलेत… कसला नया भारत है बे? कुणाला खायला उठलाय हा नया भारत ते तरी कळू द्या एकदा… उद्या ‘नया भारत है’ म्हणून राष्ट्रध्वजाच्या अशोकचक्रामध्ये २४ अऱ्यांऐवजी २४ तलवारी दाखवू नये एवढीच आता अपेक्षा राहिली आहे… विठ्ठलाSSS विठ्ठला

    Covid Vaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत?; आता सरकार देणार 5 हजार रुपये, जाणून घ्या डिटेल्स https://t.co/M23J6vgS0l

    — Krushirang (@krushirang) July 13, 2022

    BJP news Delhi politics India Politics
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    super
    • Website

    Related Posts

    Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात

    January 28, 2023

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Leave A Reply Cancel Reply

    Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात

    January 28, 2023

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात

    January 24, 2023

    GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती

    January 19, 2023

    Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही

    January 18, 2023
    Web Stories
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • About Us
    • Contact us
    • Privacy Policy
    © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Go to mobile version