Asaduddin Owaisi : ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणणारे ओवेसी खासदारकी गमावणार? जाणुन घ्या काय सांगतो नियम 102

Asaduddin Owaisi : 18व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी पाचव्यांदा सांसद पदाची शपथ घेणारे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी  ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा दिली होती.

सध्या या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू आहे. तसेच, यावरून राजकीय खलबते सुरू आहेत. ओवेसींच्या या विधानावर भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला असून, कलम 102 चा हवाला देण्यात आला आहे. भाजपने म्हटले आहे की संसदीय नियमांनुसार त्यांना संसदेतून अपात्र ठरवण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या विषयावर संसदीय नियम काय म्हणतात ते जाणुन घेऊया.

संसदीय नियम काय सांगतात?

शपथविधीवेळी असदुद्दीन ओवेसी यांनी पॅलेस्टाईनच्या नावाने घोषणाबाजी केली असता त्याला केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी विरोध केला. तेथे उपस्थित पीठासीन अधिकारी राधामोहन सिंग यांनी ओवेसी यांचे ‘जय पॅलेस्टाईन’ हे वक्तव्य रेकॉर्डवरून तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, तोपर्यंत जो वाद व्हायचा तो झालाच होता.

संसदीय नियमांनुसार, सभागृहातील कोणत्याही सदस्याने परदेशी राज्याशी निष्ठा दर्शविल्यास, त्याचे लोकसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते. तज्ञांच्या मते, एकतर त्या सदस्याला पुन्हा शपथ दिली जाऊ शकते किंवा त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते.

अमित मालवीय यांनी ओवेसींवर निशाणा साधला

भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्द्यावर भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 चा हवाला दिला आहे. त्यांनी X वर लिहिले आहे की, “सध्याच्या नियमांनुसार, ओवेसीला परदेशी राज्य म्हणजेच पॅलेस्टाईनशी निष्ठा दर्शविल्याबद्दल लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.”

कलम 102 काय म्हणते?

या संसदीय नियमानुसार, जर एखादी व्यक्ती भारताची नागरिक नसेल किंवा तिने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतले असेल, तर त्याचे सभागृहाचे सदस्यत्व काढून घेतले जाऊ शकते. याच नियमात पुढे असे लिहिले आहे की, घटनेच्या कलम 102 नुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाशी निष्ठा दर्शवली तर त्याचे सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते.

Leave a Comment