Breaking News : Arvind Kejriwal यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, ‘ती’ याचिका फेटाळली

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना धक्का देत अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. यामुळे आता केजरीवाल यांना 2 जुनला तुरुंगात जावे लागणार आहे.

 अरविंद केजरीवाल यांनी मोठा वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती मात्र आज (बुधवारी) ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय आधीच राखून ठेवण्यात आला असल्याने अंतरिम जामीन वाढवण्याची केजरीवाल यांची याचिका मुख्य याचिकेशी संबंधित नाही.

 केजरीवाल यांना 10 मे रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.

Leave a Comment