AAP : गुजरातमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका (Gujarat Elections 2022) होणार आहेत. त्यामुळे राज्यातील नेत्यांच्या दौऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आम आदमी पार्टी (AAP) देखील निवडणुकीच्या संदर्भात जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. बड्या नेत्यांसोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सातत्याने गुजरातच्या (Gujarat) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते पुन्हा एकदा दोन दिवसांसाठी गुजरातला जाणार असल्याचे वृत्त आहे. 16 आणि 17 ऑक्टोबरला केजरीवाल (Arvind Kejriwal Gujarat Visit) यांचा दौरा होणार आहे.
या दोन दिवसीय दौऱ्यात अरविंद केजरीवाल अनेक जाहीर सभा घेणार आहेत. भावनगर, मेहसाणा आणि डीसा येथे या जाहीर सभा होणार आहेत. यापूर्वी त्यांनी 8 आणि 9 ऑक्टोबरला गुजरातला भेट दिली होती. या दौऱ्यावर त्यांनी दावा केला, की गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आम आदमी पार्टीला छुप्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आपल्याच पक्षाचा पराभव पाहायचा आहे.
‘आप’ गुजरात युनिटचे प्रमुख गोपाल इटालिया (Gopal Italia) यांच्याबाबत सध्या बरेच वाद सुरू आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप आणि आप नेत्यांमध्ये जोरदार टीका टिपण्णी सुरू आहे. या मुद्द्याचा फायदा कुणाला होणार हे अद्याप सांगता येत नसले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद निर्माण झाल्याने त्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, एजन्सींच्या म्हणण्यानुसार, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की राज्यात मुख्य लढत अजूनही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. राज्यात गेल्या 24 वर्षांपासून भाजप सरकार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 12 वर्षांहून अधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री होते. केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांनीही त्यांच्या आधी हे पद भूषवले होते. मोदींनंतर विजय रुपाणी हेही मुख्यमंत्री होते आणि सध्या भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत Arvind Kejriwal यांच्या आम आदमी पक्षालाही (AAP In Gujarat Election) बळ मिळत आहे, त्यामुळे ही लढत तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.
- Must Read : AAP : भाजपला झटका देण्याचा ‘आप’ने तयार केला प्लान; पहा, काय आहे केजरीवालांचे राजकारण
- AAP : आपमध्ये खळबळ..! आमदारांबाबत काँग्रेसने केला ‘हा’ दावा.. जाणून घ्या, राजकीय अपडेट
- Gujarat Elections : निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केला ‘हा’ मोठा प्लान; पहा, काँग्रेस-आपला कशी देणार टक्कर ?
- Rajasthan Congress Crisis : काँग्रेसचा आणखी एक प्लान; पहा, ‘कसे’ टळणार राजकीय संकट ?