Arvind Kejriwal : केजरीवालांना आणखी एक दणका! पहा, काय घडलंंय दिल्लीच्या राजकारणात?

Arvind Kejriwal Arrest : तुरुंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Arvind Kejriwal Arrest) आणखी एक धक्का बसला आहे. मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी देखील सातत्याने वाढत चालल्या आहेत. आम आदमी पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते तुरुंगात असताना दुसरीकडे पक्षाला गळती लागली आहे. आता दिल्लीच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या पटेल नगरचे आमदार राजकुमार आनंद यांनी (Raj Kumar Anand) नुकताच मंत्रीपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. Arvind Kejriwal

राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. पक्षाने भ्रष्टाचार करण्यासाठी काही धोरण बनवले आहेत या धोरणांशी मी सहमत नाही म्हणूनच माझ्या आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजकुमार आनंद यांनी स्पष्ट केले.

Arvind Kejriwal : केजरीवालांना झटका! ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने फेटाळली याचिका

Arvind Kejriwal

ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या अगोदर ईडीने राजकुमार आनंद यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. ईडीने राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. राजकुमार आनंद हे दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. राजीनाम्यानंतर राजकुमार आनंद म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध आला कारण ते म्हणाले होते की राजकारण बदलले तर देश बदलेल. आज राजकारण नाही बदलले पण राजकारणी बदलले आहेत. मी माझा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे.

आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी झाला होता मात्र आज हा पक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. मला मंत्री म्हणून काम करणे कठीण झाले आहे. या भ्रष्टाचाराशी माझे नाव जोडता येत नसल्याने मी मंत्रिपदाचा राजीनामा आणि पक्षाचा राजीनामा दिला असल्याचेही राजकुमार आनंद म्हणाले.

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : बिग ब्रेकिंग! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यावर सौरभ भारद्वाज यांनी जोरदार टीका केली आहे. सर्वांना माहित आहे की त्यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा पडला होता ते दडपणाखाली आणि घाबरलेले होते त्यांच्याविरुद्ध आमचे कोणतेही तक्रार नाही एक स्क्रिप्ट त्यांना देण्यात आली होती आणि ती वाचण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता आम्ही पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवार उभा केला आहे कारण की केजरीवाल यांच्या अटकेचे कारण म्हणजे पक्ष फोडणे आणि दिल्ली पंजाब राज्याचे सरकार बरखास्त करणे असा आहे. Arvind Kejriwal

Leave a Comment