Arvind Kejriwal : केजरीवालांना झटका! ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने फेटाळली याचिका

Arvind Kejriwal Arrest : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrest) यांना मोठा दणका बसला आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका जिल्हा उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या बाबी देखील नोंदवल्या आहेत. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांचे कोठडीत रवानगी केली होती.

ईडीने केलेल्या कारवाई विरोधात अरविंद केजरीवाल यांच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देणारी ही याचिका फेटाळून लावली तसेच काही महत्त्वाचे निरीक्षणे देखील नोंदवली. ईडीने केलेली अटक ही वैध असून ईडीने समोर आणलेले पुरावे पाहता अरविंद केजरीवाल या प्रकरणात सहभागी असल्याचे दिसते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निरीक्षणामुळे आता आगामी काळात अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Delhi Liquor Policy : मोठी बातमी! केजरीवालांना दणका; ‘त्या’ प्रकरणात घरी धडकले ‘ईडी’चे अधिकारी

Arvind Kejriwal

ईडीचा युक्तिवाद आहे की आतापर्यंतचे पुरावे केजरीवाल निमंत्रक असल्याचे दाखवतात. गोवा निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर केजरीवाल यांच्या वकिलाने विरोध केला. सरकारी साक्षीदार होण्याचा निर्णय कोर्टाकडून घेतला जातो तपास यंत्रणांकडून नाही असेही न्यायालयाने या प्रकरणात म्हटले. आरोपीनुसार तपास होऊ शकत नाही. न्यायालयाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही तसेच मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा कोणताच विशेष अधिकार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान याआधी ईडीने प्रदीर्घ चौकशीनंतर 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यानंतर 22 मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते. अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात तुरुंगवास भोगत आहेत. Arvind Kejriwal

Arvind Kejriwal यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर Satyapal Malik होत आहे ट्रेंड, ‘हे’ आहे कारण

Leave a Comment