Arvind Kejriwal News : केजरीवाल देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Arvind Kejriwal News : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे.

केजरीवाल यांना इडीने कारवाई करत दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक केली आहे. सध्या केजरीवाल तिहार तुरुंगात बंद आहेत. यामुळे त्यांच्या जागी दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे मात्र आता केजरीवाल यांना एका मोठा दिलासा मिळाला आहे.

 दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणी आपला निर्णय देत केजरीवाल यांना मोठा दिलासा दिला आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास नाकार देत याचिका फेटाळून लावली आहे.

केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?

दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री राहतील की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. हायकोर्टाने याचिकाकर्त्याला घटनात्मक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या खटल्याचा निकाल देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. जर कोणी संघर्ष आणि अडचणीतून जात असेल तर राष्ट्रपती किंवा एलजी निर्णय घेतील, न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. देशाच्या राजकारणातला हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांच्यावतीने आपली बाजू मांडली. सिंघवी म्हणाले की, निवडणुका आल्या आहेत आणि यावेळी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे जेणेकरून ते तेथील निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकत नाहीत.

पुढे सिंघवी म्हणाले, “निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळतील हे न्यायालयाला पहावे लागेल. नोव्हेंबरमध्ये पहिले समन्स जारी करण्यात आले आणि मार्चमध्ये अटक करण्यात आली. पीएमएलए अंतर्गत त्याला अटक करण्यासाठी ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत.

दुसरीकडे,  आतिशी यांनी सांगितले की, केजरीवाल यांना दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात अद्याप दोषी ठरवण्यात आले नसल्याने ते राजीनामा देणार नाहीत. “अरविंद केजरीवाल यांच्याकडे दिल्ली विधानसभेत प्रचंड बहुमत आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल राजीनामा देणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी आज राजीनामा दिल्यास विरोधी पक्षांची सरकारे पाडणे हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत सोपा आणि थेट उपाय असेल.

Leave a Comment