Arvind Kejriwal | जामीनासाठी केजरीवालांची भन्नाट आयडीया, तुरुंगात मिठाई अन् फळांचा प्लॅन; कुणी केला दावा?

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत (Arvind Kejriwal) ईडीने मोठा दावा केला आहे. ईडीने कोर्टात सांगितले की अरविंद केजरीवाल जामीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून तुरुंगात मिठाई खात आहेत. अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Scam) सध्या तिहार तुरुंगात बंद आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना काही तासांच्या चौकशीनंतर 21 मार्च रोजी दारू घोटाळ्यात अटक केली होती.

दरम्यान, केजरीवाल यांच्या याचिकेवर गुरुवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठा दावा केला. इडीने कोर्टात सांगितले की अरविंद केजरीवाल जामीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून मिठाई खात आहेत केजरीवाल यांना टाईप 2 मधुमेह आहे तरीही ते तुरुंगात बटाटा-पुरी, आंबे आणि मिठाई खात आहेत.

Arvind Kejriwal News : केजरीवाल देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Arvind Kejriwal

ईडीने न्यायालयाला सांगितले की केजरीवाल यांची साखरेची पातळी जास्त आहे असे सांगण्यासाठी कारण तयार करू इच्छित होते. त्यामुळे ईडीच्या या दाव्याची खात्री करण्यासाठी केजरीवाल यांच्या डायट चार्टबाबतही न्यायालयाने तिहार तुरुंगाकडून अहवाल मागवला आहे. केजरीवाल यांनी नुकतीच कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी कोर्टात दाद मागितली होती आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्य तपासणीसाठी त्यांना त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहायचे आहे असे म्हटले होते.

जामीन मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल आपल्या खाण्यापिण्याच्या आहारात अधिक गोड पदार्थ खात असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांना टाईप 2 डायबिटीस आहे अशात ते बटाटा, आंबे आणि मिठाई यांसारख्या गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत आहेत. शरीरातील साखरेची पातळी वाढल्यास वैद्यकीय कारणासाठी केजरीवाल यांना जामीन मिळू शकतो. यामुळेच ते गोड पदार्थांचे सेवन करीत असल्याचे ईडीने न्यायालयात स्पष्ट केले. ईडीच्या या आरोपांनंतर न्यायालयाने आता केजरीवाल यांचा डायट चार्ट मागवला आहे.

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : बिग ब्रेकिंग! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

दरम्यान, केजरीवाल यांना घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. यासोबतच तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांना एक डायट प्लॅन दिला आहे. या डायट प्लॅनमध्ये केजरीवाल कोणत्या पदार्थांचे सेवन करत आहेत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. केजरीवाल सध्या प्रमाणापेक्षा जास्त आंबे मिठाई बटाटे खात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

Leave a Comment