Army Helicopter Crashes: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ शुक्रवारी लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश झाले. गुवाहाटीचे (Guwahati) संरक्षण जनसंपर्क अधिकारी (protection public relations officer) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग क्षेत्राजवळ अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) क्रॅश झाले.
यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Union Minister Kiren Rijiju) यांनी अपघातस्थळाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि ट्विट केले की, “अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या (indian army) प्रगत लाईट हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी मिळाली. माझ्या मनापासून प्रार्थना.”
Received very disturbing news about Indian Army’s Advanced Light Helicopter crash in Upper Siang District in Arunachal Pradesh. My deepest prayers 🙏 pic.twitter.com/MNdxtI7ZRq
— Kiren Rijiju (@KirenRijiju) October 21, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात स्थळ रस्त्याने जोडलेले नसल्याने तुटिंग मुख्यालयातून बचाव पथक (rescue team) पायी रवाना करण्यात आले आहे. अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर (SP Jummar Basar) म्हणाले, “अपघाताची जागा रस्त्याने जोडलेली नाही. बचाव पथक पाठवण्यात आले असून इतर सर्व तपशीलांची प्रतीक्षा आहे.”
संरक्षण प्रवक्ते कर्नल एएस वालिया (A S Walia) यांनी सांगितले की, ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका फॉरवर्ड एरियामध्ये नेहमीच्या उड्डाण घेण्या दरम्यान घडली. विमानातील दोन वैमानिकांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या वैमानिकांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी या वर्षातच 5 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चीता हेलिकॉप्टर अपघातात भारतीय लष्कराच्या पायलटचा मृत्यू झाला होता. लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तवांगजवळच्या फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे चीता हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाण दरम्यान सकाळी १०.०० वाजता कोसळले.”