Army Area News : लष्कराच्या आस्थापनांच्या (Army Offices) परिसरात बांधकामांना (Construction) तूर्तास परवानगी देऊ नये, तसेच नव्याने दिलेल्या परवानग्या मागे घ्याव्यात, अशा सूचना लष्कराने महापालिकेस (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. परिणामी, शहरातील लष्कराच्या हद्दीच्या परिसरात नव्याने होणाऱ्या बांधकामांना ब्रेक लागला आहे.
आपल्या हद्दीच्या परिसरातील बांधकामांना परवानगी देताना किती अंतरावर द्यावी, याबाबत २०१६ च्या नियमाचे लष्कराकडून पुनर्विलोकन सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने तूर्त बांधकाम परवाने (building permission देऊ नयेत, अशी भूमिका लष्कराने घेतली आहे. २०१६ च्या नियमानुसार लष्कराच्या आस्थापनाच्या हद्दीपासून १० मीटर पुढे असलेल्या बांधकामांनाच महापालिकेकडून बांधकाम परवाने दिले जात होते.
- Pune Public Issue News : नागरिकांनी केले रस्त्यासाठी आंदोलन – कोंढवा डेव्हलपमेंट फोरमने घेतला पुढाकार
- PMC Exam Result News : अबब… तब्बल 180 गुण घेऊन पास झाला उमेदवार
- Pune Politics News : शेवटी पुणेकरांच्या मिळकत कराच्या प्रश्नात राज ठाकरेंनी घातले लक्ष
- Pune Politics News : तुम्ही बारामती सांभाळा, भाजपची काळजी नका करू : चित्र वाघ यांची भोसरी टीका
महापालिका प्रशासनाने (PMC authority) दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या हद्दीपासून (Army limit) बांधकाम परवानगी देताना २०११ मध्ये लष्कराने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लष्कराच्या आस्थापनेपासून १०० मीटर (100 Mtr) अंतरापर्यंत कोणतीही बांधकाम परवानगी दिली जात नव्हती. १०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत लष्कराची “एनओसी’ घ्यावी लागत होती. मात्र या निर्णयामुळे शहराच्या बांधकाम क्षेत्रावर परिणाम (impact on City construction business) होत असल्याने यात बदल करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, लष्कराने २०१६ मध्ये सुधारित सूचना काढल्या. त्यात लष्कराच्या हद्दीपासून 10 मीटर पुढे परवानगी देण्यास महापालिकेस मुभा देण्यात आली. मात्र आता लष्क़राकडून २०१६ च्या नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने २०१६ च्या नियमानुसार कोणत्याही परवानग्या देऊ नयेत तसेच सुधारणा होणार असल्याने ५०० मीटर अंतरापर्यंत तूर्तास लष्कराची “एनओसी’ (NOC) घ्यावी असे कळविले आहे. तर ज्या भागात महापालिकेने ५०० मीटरच्या आत काही नवीन परवाने दिले आहेत, त्या भागात सुरू असलेली कामे तातडीने थांबविण्याच्या सूचनाही लष्क़राने केल्या आहेत.
३० ते ४० टक्के बांधकामांना फटका
शहराच्या चारही दिशांना लष्कराच्या मिळकती आहेत. शहराच्या हद्दीत पुणे (Pune) आणि खडकी छावणी (Khadki Cantonment) हद्द असून, सीएमई (CME), एएफएमसी महाविद्यालय (AFMC), बॉम्बे सॅपर्स (Bombay suppers), डीआरडीओ (DRDO), सदर्न कमांड (Sadan command), एनडीए (NDA), औंध मिलिटरी स्टेशन, लोहगाव विमानतळ (Lohgaon air force base), लष्कर इस्टेट अशी मोठमोठी कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या आसपासच्या भागात शहराची उपनगरे विस्तारलेली आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये लष्कराने परवानगीचे बंधन बहुतांश प्रमाणात शिथिल केल्यानंतर या अस्थापनांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. मात्र, या आधी दिलेल्या परवान्यांना शिथिलता देत लष्क़राकडून नवीन परवान्यांना बंधने घालण्यात येत असल्याने शहरातील ३० ते ४० टक्के बांधकामांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेत होणार बैठक
या बांधकाम परवान्यांबद्दल महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी तातडीने बैठक बोलविली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची ही बैठक होणार असून, त्यावर काय तोडगा काढता येईल, यावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर, महापालिकेकडून लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. बुधवारी (दि. 19) महापालिकेत ही बैठक होणार आहे.