Apps Alert: विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून आज देशासह जगात फसवणुकीचे प्रकरण वाढत चालले आहे. त्यामुळे सावधान रहाणे खूप गरजेचे आहे.
यातच तुम्ही देखील नवीन ॲप घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वापरत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो गुगलने मोठी करत प्ले स्टोअरवरून iRecorder नावाचे स्क्रीन रेकॉर्डिंग अॅप काढून टाकले आहे.
या अॅपमध्ये मालवेअर आढळल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे अॅप वापरकर्त्याच्या नकळत 15 मिनिटांत आसपासचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि डेव्हलपरपर्यंत पोहोचवू शकतो. आतापर्यंत ते 50 हजाराहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.
अहवालानुसार, तो सप्टेंबर 2021 मध्ये आला होता, यावेळी त्यात कोणताही मालवेअर आढळला नाही. परंतु ऑगस्ट 2022 मध्ये ते डेव्हलपरने अपडेट केले आणि मालवेअर जोडले गेले.
लोकेशन ट्रॅक करता येते
सायबर सिक्युरिटी फर्म ESET ने अलीकडेच एका अहवालात iRecorder मध्ये ट्रोजन मालवेअर सापडल्याचा खुलासा केला आहे. अहवालात असेही नमूद केले आहे की या अॅपमध्ये AhMyth RAT वर आधारित 2 कोड आढळले आहेत.
या साधनाद्वारे अनेक चुकीचे उपयोग होऊ शकतात. वापरकर्ते कॉल लॉग, मेसेज आणि कॉन्टॅक्ट फिल्टर करू शकतात. तसेच लोकेशन ट्रॅक करता येते. एसएमएस पाठवण्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगही करता येणार आहे.
हे काम करा
तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप असेल तर ते लगेच डिलीट करा. अन्यथा, तुमच्या सुरक्षिततेला धोका वाढू शकतो. वापरकर्त्यांच्या गोपनीयता डॅशबोर्डवर जाऊन तुमचा मायक्रोफोन वापर तपासण्याची खात्री करा. कोणत्याही अविश्वासू प्लॅटफॉर्मवरून कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. कंपनीने दिलेला स्क्रीन रेकॉर्डर वापरा.