दिल्ली : युक्रेनने सलग दुसऱ्या दिवशी रशियात घुसून आणखी एक हवाई तळ उद्ध्वस्त केले. ड्रोन हल्ल्यात हवाई दलाच्या तळावरून ज्वाळा उठल्याचे चित्रही समोर आले आहे. स्वत:वर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या रशियाने यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत पाठवत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. त्याचवेळी रशियाच्या आरोपानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ब्लिंकेन म्हणाले की, आमच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही युक्रेनला हल्ल्यासाठी प्रवृत्त केलेले नाही.
वास्तविक, ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली सुरक्षा परिषद बोलावली होती. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. या बैठकीत लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ल्यासाठी अमेरिकेला थेट जबाबदार धरले कारण अमेरिकेने अद्याप या हल्ल्याचा निषेध केला नाही. इतकंच नाही तर यावेळी युक्रेननेही थेट हल्ला स्वीकारणं टाळलं आहे.
युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या ATACMS क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला होता. यामुळे रशियन सैन्य, अमेरिका आणि नाटो सैन्यात थेट चकमक होण्याची भीती अमेरिकेला आहे. परंतु तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की युक्रेनने सोमवारी जुन्या लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर केला.
सोमवारी युक्रेनच्या ड्रोन विमानांनी रशियाच्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दोन हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात रशियाचे यांचे तीन सैनिक ठार झाले तर चार जखमी झाले. युक्रेन आणि ब्रिटेनला घाबरविण्यासाठी रशियाने हे बॉम्बर तैनात केले होते. त्याच वेळी, युक्रेनकडून आणखी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, रशियन एअरबेसला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याआधी दोन एअरबेसवर मोठे स्फोट झाल्याची नोंद झाली होती, परंतु अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
- हे सुद्धा वाचा : युद्ध संपविण्यासाठी अखेर रशिया तयार पण, ‘ही’ अट ठेवली कायम; पहा, काय सुरू आहे युद्ध मैदानात
- बाब्बो.. युरोप रशियाला धक्का देण्याच्या तयारीत; पण, भारत-चीन करणार रशियाची मदत; पहा कसे ते ?