Anti Ageing Foods : वाढत्या वयातही दिसायचंय तरुण ; मग ‘या’ सुपर फुड्सचा खुराक सुरू कराच!

Anti Ageing Foods : सुंदर आणि तरुण दिसण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. असं क्वचितच कुणी (Anti Ageing Foods) असेल ज्याला अशी इच्छा वाटत नसेल. पण वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे सौंदर्यातही कमीपणा येतो. अशा परिस्थितीत लोक दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु यामुळे चेहरा खराब होण्याची ही भीती असतेच. मेकअप केल्यानंतर चेहरा तरुण आणि टवटवीत वाटत असला तरी या उत्पादनांचे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यताही असते. अशा परिस्थितीत काही अँटीएजिंग फूड्सच्या मदतीने तुम्ही स्वतःला तरुण ठेवू शकता.

नेहमी तरुण दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. ब्युटी पार्लरमध्येही जातात. बरेच लोक स्किन केअर रुटीन फॉलो करतात. परंतु जर तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही खाद्य पदार्थांचा समावेश करावा लागेल.

Anti Ageing Foods

खरंतर आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागले आहेत. वयाच्या 35 आणि 40 व्या वर्षी त्यांच्या चेहऱ्यावर ठिपके आणि डाग दिसून येतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसून येतील. अशा परिस्थितीत तुम्ही काही खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केला तर यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकेल.

Skin Care Tips in Summer : उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी; ‘या’ टिप्स करतील मोठ्ठी मदत

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी इत्यादी अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वांनी समृद्ध बेरी तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवू शकतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या त्वचेतील वय संबंधित बदल कमी करतात. ज्यामुळे तुम्ही तरुण दिसू लागता. याशिवाय ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून सूज कमी करण्यासही मदत करू शकतात.

फॅटी फिश

ज्यांना नॉन व्हेज खाद्यपदार्थ आवडतात त्यांच्यासाठी चरबीयुक्त मासे (Faty Fish) त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. फॅटी फिश खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी राहू शकते.

Anti Ageing Foods

बदाम, अक्रोड खा 

बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया इत्यादी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. विटामिन ई समृद्ध असलेल्या या खाद्यपदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला मोठी मदत मिळू शकते.

Skin care tips । वयाच्या तिशीनंतर रोज प्या ‘हा’ खास चहा, चेहरा राहील चमकदार आणि तरुण

ग्रीन टी

ग्रीन टी पिल्याने वजन (Green Tea) नियंत्रित राहण्यास मदत होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण ग्रीन टी चा आणखीही एक फायदा आहे तो म्हणजे ग्रीन टी सेवनाने त्वचा निरोगी राहते. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यास त्वचेच्या पेशी निरोगी राहतात यामध्ये असलेले पॉलिफेनॉल विशेषतः अँटिऑक्सिडंट आणि गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी राखण्यास मदत करतात.

Leave a Comment