Animal Husbandry : सरकारने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट! पशुसंवर्धनासाठी तयार केले हे खास ॲप, जाणून घ्या फायदे

Animal Husbandry : शेतीसोबत पशुपालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालन करताना तुम्ही योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने खास शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धनासाठी ॲप तयार केले आहे. जाणून घ्या फायदे.

ॲपचा फायदा

राज्य सरकारने तयार केलेल्या या ॲपचे नाव ‘फुले अमृतकल’ पशुसल्ला मोबाईल ॲप असून यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत मदत होईल. या ॲपचे लोकार्पण करताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. बोलताना ते म्हणाले की, वेगवेगळ्या परिस्थितीमुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण होते.

अशा वेळी हे ॲप पशुपालकांना मदत करेल. उन्हाळ्यात ताणतणाव टाळण्यासाठी जनावरांना सावली कशी द्यावी, हे शेतकरी बांधवांना ॲपद्वारे समजू शकते. इतकेच नाही तर वायुवीजन करणे, पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करणे, पंखे आणि फॉगर यंत्रणा चालवणे तसेच जनावरांसाठी संतुलित आहाराचे नियोजन करणे अशी सर्व कामे तुम्हाला ॲपद्वारे करता येतील.

असे करा डाउनलोड

हे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Google Play Store ॲप स्टोअरचा वापर करावा लागेल. इतकेच नाही तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन ‘फुले अमृतकाल’ टाइप करून सर्च करू शकता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे हे फुले अमृतकाल मोबाईल ॲप तुमच्यासमोर प्रथम क्रमांकावर येईल.

यानंतर तुम्हाला या ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा नंबर टाकावा लागणार आहे. यानंतर OTP टाकावा लागू शकतो. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागणार आहे.

नोंदणी करताच तुम्ही पुन्हा ॲप चालू करू शकता. यानंतर तुम्ही गोठ्याची किंवा तुम्ही निवडलेली जागा निवडावी लागणार आहे. त्याचे तापमान आणि आर्द्रता निर्देशांक तुमच्या समोर प्रदर्शित केले जातात. त्यामुळे गायींच्या ताणाची माहिती मिळेल. मग तुम्हाला त्यानुसार सल्ला देण्यात येतो. या ॲपद्वारे, तुम्हाला ओपन सोर्स हवामान माहिती तसेच आर्द्रता सेन्सर वापरून रिअल टाइम डेटावर आधारित सल्ला मिळेल.

Leave a Comment