मुंबई – रोहित शर्माने (Rohit Sharma) आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या T20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. विराट कोहलीनंतर (Virat Kohli) अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एका सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध हे केले. या सामन्यात हा आकडा गाठण्यासाठी त्याला 25 धावा कराव्या लागल्या. तो 28 धावा करून बाद झाला. या सामन्यात प्रथम खेळताना पंजाब किंग्जने 5 गडी गमावत 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 4 षटकांत 1 गडी बाद 31 धावा केल्या. हा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. याआधी खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाबने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
रोहित शर्माने 362 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने 299 डावात ही कामगिरी केली होती. म्हणजेच त्याने कोहलीपेक्षा 63 डाव जास्त घेतले. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार ठोकत रोहितने 10 हजार धावांचा टप्पा गाठला. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने 17 चेंडूत 28 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 षटकार मारले. चालू मोसमातील 5 सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 285 डावात ही कामगिरी केली. रोहित शर्मा T20 मध्ये 10,000 धावा करणारा जगातील 7वा खेळाडू ठरला आहे. याआधी गेल, कोहली, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड यांनीही ही कामगिरी केली आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.
75 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या
रोहित शर्माच्या एकूण टी-20 विक्रमाकडे पाहता, हा त्याचा 375 वा सामना होता. त्याने 6 शतके आणि 69 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच 75 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 118 धावांची सर्वोच्च खेळी. स्ट्राइक रेट 134 आहे. त्याने 400 हून अधिक षटकारही मारले आहेत.