Amol Mitkari । धक्कादायक! अमोल मिटकरींच्या कारवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू; नेमकं कारण आलं समोर

Amol Mitkari । मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची अकोल्यात तोडफोड केली. पुणे शहरातील पुरावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असा टोकाचा वाद निर्माण झाला.

अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता होता. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ही टीका मनसे या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.

अमोल मिटकरी अकोल्यात विश्राम गृहात गेले असता बाहेर उभी असणारी कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. यावेळी चांगलाच राडा झाला होता. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात देखील दाखल केले होतं. पण त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “आंदोलनानंतर जय मालोकारच्या छातीत दुखायला लागलं. त्यावेळी आमचे काही कार्यकर्ते त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. त्याचा इसीजी काढण्यात आला. त्यात समजलं की त्याला हृदय विकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्याला एन्जोग्रॉफीसाठी आयसीयूत नेलं गेलं. पण एन्जोग्रॉफी करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला”.

Leave a Comment