Amit Shah On Udhav Thackeray: अमित शहांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले, हिंमत असेल तर उत्तर …

Amit Shah On Udhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पालघरमध्ये महायुतीचे उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली या जाहीर सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत त्यांना पाच प्रश्न विचारले आहे.

या सभेत बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना पाच प्रश्नही विचारले. हिंमत असेल तर या प्रश्नांची उत्तरे द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.  मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का, असा सवाल अमित शहा यांनी केला. एका पत्रकाराने शरद पवारांना विचारले तुमचा नेता कोण? तर पवार म्हणाले आमच्याकडे खूप आहेत? जनतेला फुकट धान्य कोण देऊ शकतो ते फक्त मोदीच देऊ शकतात. त्यांच्या खिचडी सरकारने 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले. पण मोदींवर घोटाळ्याचा आरोप कोणी करू शकत नाही. मुंबईत हल्ले झाले आणि आमचे मौनी बाबा काही करू शकले नाहीत. पुलवामा आमच्या काळात झाला. नरेंद्र मोदी सरकारने शत्रूंच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिले. हे लोक पाकिस्तानला उत्तर देऊ शकतील का?

अहो उद्धव ठाकरे, तुम्ही कोणासोबत आहात? काश्मीरबाबत खरगे यांची भूमिका काय? आम्ही कलम 370 हटवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मोदींनी राम मंदिरही बांधले. संपूर्ण देशाने जय श्री रामचा नारा दिला. निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी गेले नाहीत. असं अमित शहा म्हणाले.

Leave a Comment