America News : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर युक्रेन इस्त्रायल मदत पॅकेज (America News) अमेरिकन संसदेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले. मंगळवारी अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात ७९ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर 18 सदस्यांनी विरोधात मतदान केले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या आठवड्यात हे विधेयक अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर रिपब्लिकन नेत्यांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि युक्रेन इस्त्रायल आणि तैवानला 95 अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याच्या विधेयकाला समर्थन दिले.
या पॅकेजमधील सर्वात मोठा 61 अब्ज डॉलरचा हिस्सा युक्रेनला प्रदान केला जाईल. याशिवाय इस्त्रायल आणि जगभरातील संघर्ष झोनमधील नागरिकांसाठी 26 अब्ज डॉलर्स मानवतावादी मदतीसाठी आणि 8.12 अब्ज डॉलरचा तिसरा भाग चीनचा सामना करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. चौथे विधेयक गेल्या आठवड्यात सभागृहात मांडण्यात आले. यामध्ये चीन नियंत्रित सोशल मीडिया ॲप टिकटॉकवर बंदी, जप्त केलेली रशियन मालमत्ता युक्रेनमध्ये हस्तांतरित करण्याचे उपाय आणि इराणवर नवीन निर्बंध समाविष्ट आहेत.
Israel Hamas War : पाकिस्तानचा डाव, इस्त्रायलविरोधात प्रस्ताव; भारतानेही केलं ‘हे’ मोठं काम
America News
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले होते की सभागृहात विधेयक मंजूर होताच त्यावर सही करून कायद्यात रूपांतरित केले जाईल. दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की बायडेन प्रशासन युक्रेनसाठी एक अब्ज डॉलरचे लष्करी मदत पॅकेज आधीच तयार करत आहेत.
यूएस डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन नेत्यांनी सांगितले की त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अन्य परदेशी विरोधकांना इशारा दिला आहे की अमेरिका युक्रेनला पाठिंबा देत राहील. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील तेव्हा युक्रेनला मदतीचे पॅकेज मंजूर केले जाऊ शकते. हे मदत पॅकेज यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर माइक जॉन्सन यांनी सादर केले होते. या अंतर्गत युक्रेन इस्त्रायल व्यतरिक्त इंडो पॅसिफिक प्रदेशातही मदत पाठवण्याचे प्रस्तावित आहे.
America : रशियाला झटका! अमेरिकेकडून नव्या निर्बंधांची घोषणा, कारणही धक्कादायक